‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातार अडकली विवाहबंधनात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

झी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या  मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार ही श्रीकांत चवरे याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातले खास व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत.

सिद्धार्थ चांदेकर याने त्यांच्या लग्नातला व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत गायत्री दातारने गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत अंत्यंत सुंदर दिसत आहे. शिवाय हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरलेला दिसत आहे. तर तिच्या नवऱ्याने सफेद रंगाची शेरवानी घातल्याचे दिसत आहे. गायत्री आणि श्रीकांत एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालताना क्षण व्हिडीओत टिपला आहे.पुण्यातील भोर येथे गायत्रीचा विवाह सोहळा पार पडला. अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.

काही महिन्यांपूर्वी एक पोस्ट शेअर करत तिने प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये तिचा नवरा कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. गायत्री आणि श्रीकांत यांची भेट एका डेटिंग अॅपवर झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.