दक्षिण सुदानमध्ये भीषण विमान अपघात, पायलटसह सर्व १४ प्रवाशांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण सुदानची राजधानी जुबा येथे सोमवारी एक भीषण विमान अपघात झाला. जुबा येथील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एक छोटे विमान कोसळले असून, या अपघातात पायलटसह सर्व १४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. टीव्ही९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दक्षिण सुदान सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, सेसना (Cessna) कंपनीचे हे विमान सकाळी ०७:१५ वाजता (स्थानिक वेळेनुसार) जुबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले होते. मात्र येथून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले. या अपघातात विमानातील कोणीही वाचू शकले नाही. मृतांमध्ये १२ दक्षिण सुदानी आणि २ केनयाई नागरिकांचा समावेश आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या संयुक्त राष्ट्राच्या (UN) बचाव पथकातील एका सदस्याने सांगितले की, विमानाने पेट घेतल्यामुळे सर्व मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये विमानाचा ढिगारा आगीच्या विळख्यात दिसत असून आजूबाजूचा परिसर डोंगराळ आणि धुक्याचा असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दक्षिण सुदानमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव, विमानातील ओव्हरलोडिंग आणि खराब हवामान यामुळे सातत्याने विमान अपघात होत असतात.

Comments are closed.