Office Desk Setup : ऑफिस डेस्क कसा असावा?




आदर्श कार्यालय डेस्क सेटअप


एक ऑफिस वर्किंग करणारी व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष दिवसाचे जवळपास 8 ते 9 तास कामाच्या ठिकाणी घालवते. त्यामुळे जिथे तुम्ही काम करत आहात तेथील वातावरण आणि ऑफिस डेस्क उत्तम असणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते एक आदर्श ऑफिस डेस्क उत्पादकता वाढवणारा, आरामदायक आणि सुव्यवस्थित असावा, जेणेकरून कामात एकाग्रता राहते आणि ताण कमी होतो. आज आपण ऑफिस डेस्क कसा असावा यासंदर्भातील काही टिप्स पाहणार आहोत.

  • ऑफिस डेस्कची उंची अशी असावी की कंप्युटरवर काम करताना पाठीला आणि मानेला ताण येणार नाही.
  • डेस्कखाली पायांना हालचाल करण्यासाठी पुरेशी मोकळी जागा असावी. अनेक जणांच्या डेस्कखाली वायरचा गुंता किंवा जुन्या फाईल्स पडलेल्या असतात. परंतू असा डेस्क काम करण्यास अडचणी आणू शकतो आणि शारीरिक व्याधी निर्माण करणारा ठरू शकतो.
  • कंप्युटरचे स्क्रीन तुमच्या डोळ्यांच्या समपातळीवर असावे, जेणेकरून मान दुखणार नाही.
  • स्क्रीन आणि तुमच्यामध्ये साधारण 20 ते 30 इंचांचे अंतर असावे.
  • डेस्कवर पेन, डायरी, पाण्याची बाटली आणि फोन या गोष्टी हाताच्या जवळ असाव्यात.

हेही वाचा – सार्वजनिक शौचालय वापरताना घ्या खबरदारी

  • डेस्कचे भाग पाडा. डाव्या बाजूला नेहमी लागणाऱ्या वस्तू (उदा. पेन, डायरी), मधल्या भागात मुख्य काम (लॅपटॉप/कीबोर्ड) आणि उजव्या बाजूला माउस ठेवा.
  • डेस्कवर फक्त त्याच गोष्टी ठेवा ज्यांची तुम्हाला रोज गरज असते अनावश्यक कागदपत्रे,फाईल्स, रद्दी टाळा.
  • तुम्ही ड्रॉवर्स असलेले टेबल निवडू शकता, ज्यामुळे फाईल्स आणि स्टेशनरी व्यवस्थित ठेवता येईल.
  • जर टेबलला ड्रॉवर नसतील तर लहान ऑर्गनायझर्स किंवा रॅक्सचा वापर करून पेन, कात्री आदी गोष्टी ठेवू शकता.
  • जर काम जास्त असेल तर एल-आकाराचा डेस्क असणे फायद्याचे ठरेल. ज्यावर एकीकडे कंप्युटर आणि दुसरीकडे फाईल्स ठेवता येतील.
  • कंप्युटरच्या वायर्सचा गुंता टाळण्यासाठी वायर क्लिप्सचा वापर करावा.
  • डेस्कवर लहान शोभेची झाडे ठेवल्याने सकारात्मकता वाढते. तुम्ही ‘स्नेक प्लांट’ किंवा ‘मनी प्लांट’ ठेवले तर डोळ्यांना आराम मिळेल.
  • डेस्क अशा ठिकाणी असावा जिथे पुरेसा नैसर्गिक प्रकाश येईल. प्रकाश थेट स्क्रीनवर पडणार नाही याची काळजी घ्या अन्यथा डोळ्यांवर ताण येईल.
  • एखादे प्रेरणादायी वाक्य लावल्यास कामात उत्साह टिकून राहतो.
  • जर तुम्ही रात्री किंवा अंधारात काम करत असाल तर एक चांगला ‘डेस्क लॅम्प’ वापरा जो तुमच्या स्क्रीनवर चमक न आणता कामाच्या जागेवर प्रकाश देईल.

हेही वाचा – महिला उद्योजिकांसाठीही आर्थिक साक्षरता महत्त्वाची



Comments are closed.