तामिळनाडू निवडणुकीच्या निकालापूर्वी थलपथी विजय यांनी शिर्डीतील साईबाबांच्या दरबाराला दिली भेट – Tezzbuzz
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळवल्यानंतर विजय थलपथीने (Vijay Thalapathy) तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. टीव्हीके पक्षाच्या अध्यक्षांचे राजकीय भवितव्य लवकरच ठरणार आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे. त्याआधी विजय विविध मंदिरांना भेटी देत आहे.
बुधवारी, साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयने शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेतले. तो साईबाबांच्या मूर्तीसमोर हात जोडून बसलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर शांत भाव होते. मंदिरात पोहोचण्यापूर्वी विजयला चाहत्यांच्या गर्दीने घेरले होते.
अभिनेते आणि टीव्हीके प्रमुख विजय यांनी तामिळनाडू निवडणुकीच्या निकालापूर्वी मंगळवारी तिरुचेंदूर मुरुगन मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली. ते काल रात्री उशिरा चेन्नईहून खासगी विमानाने मदुराई येथे दाखल झाले. त्यानंतर विजय यांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. ते पारंपरिक वेशभूषेत दिसले.
कामाच्या आघाडीवर बोलायचे झाल्यास, विजयचा शेवटचा चित्रपट, ‘जना नायकन’, अजूनही प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार असलेला हा चित्रपट सध्या सेन्सॉर बोर्डासोबतच्या वादामुळे रखडला आहे. अलीकडेच, हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, तामिळनाडू विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर ‘जना नायकन’चे निर्माते ८ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित करू शकतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.