Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
मुख्यमंत्री झाल्यानंतर… खरंतर त्याच कारणानं सहा वर्षांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषदेत गेले… आता मुख्यमंत्रीपद नसलं, तरीही त्यांनी विधिमंडळात असावं, असा ठाकरेसेनेच्या मित्रपक्षांचा आग्रह होता… मात्र हा आग्रह मोडून त्यांनी अंबादास दानवेंच्या नावाला पसंती दिली खरी… पण त्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालीये… दानवेंना शह देत काँग्रेसनं उमेदवार उतरवण्याची तयारी केलीये… त्यामुळे निवडणुकीची चुरस वाढणार आहे… राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय, त्यावर हा स्पेशल रिपोर्ट बघुयात…
राज्यात पुढल्या महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत अनपेक्षित ट्विस्ट आलाय…
विधानसभेच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीचा एकच उमेदवार निवडला जाऊ शकतो…
आणि या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधिमंडळात जावं, असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आग्रह होता…
मात्र ठाकरे काही उमेदवारीवर आपले पत्ते उघड करत नव्हते…
अखेर उमेदवारी अर्ज दाखल करायला एक दिवस बाकी असताना आदित्य ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर केलं…
आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही दानवेंचं नाव ‘एक्स’ पोस्टवर जाहीर केलं….
अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील…
उद्या ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली…
असं राऊतांनी लिहिलं…
Comments are closed.