IPL 2026 – बुमराहला विकेट मिळेना अन् मुंबई जिंकेना! वानखेडेवर हैदराबादचा जलवा, 6 विकेट्सने सामना जिंकला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी करत चाहत्यांचा हिरमोड केला आहे. 243 धावांचा डोंगर उभारूनही गोलंदाजांना दमदार कामगिरी करता आली नाही. प्रत्युत्तरात हैदराबादने 18.4 षटकांमध्येच 249 धावा करत 6 विकेटने सामना जिंकला. जसप्रीत बुमराहाने 4 षटकांमध्ये 54 धावा दिल्या मात्र एकही विकेट त्याला घेता आली नाही. आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेव्हिस हेड 30 चेंडूंमध्ये 76 धावांची खेळी करत पुन्हा फॉर्मात आला, तर अभिषेक शर्मानेही 45 धावांची सलामी देत संघाचा धमाकेदार सुरुवात करून दिली. क्लासेनने नाबाद 30 चेंडूंमध्ये 65 धावा करत संघालचा विजय निश्चित केला. त्याने आपल्या बॅटने 4 षटकार आणि 7 चौकार मारले. अखेरच्या षटकांमध्ये सलील अरोराने 10 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 2 चौकार मारत 30 धावांची तडाखेबंद खेळी करत आपले हात धुवून घेतले आणि हैदराबादने 18.4 षटकांमध्ये अगदी दिमाखात सामना खिशात घातला

Comments are closed.