Pune: बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅसची गळती; २४ जण रुग्णालयात दाखल
पुण्यातील कोंढवा भागात गुरुवारी मध्यरात्रीनंतर क्लोरीन गॅसची गळती झाल्यामुळे किमान २२ रहिवासी आणि दोन अग्निशमन दलाच्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.
पीटीआयने अग्निशमन दलाच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, गंगाधाम परिसरातील एका बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या गोदामात असलेल्या क्लोरीनच्या जुन्या टाकीतून पहाटे १ च्या सुमारास ही गळती सुरू झाली.
Comments are closed.