रेमो डिसूझाच्या बंगल्यात शिवमंदिर, ख्रिश्चन पत्नी लिझेल दररोज करते पूजा-पाठ – Tezzbuzz
रेमो डिसूझा हा एक डान्सर आणि लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आहे. तर आता तो चित्रपट निर्मातीही करतो. तसेच तो डान्स इंडिया डान्स चा जज देखील होता. त्यानंतर त्याने या शोमध्ये अनेक बदल करून या शोला एक उच्च स्तरावर नेऊन ठेवले. त्यामुळे या शोच्या अनेक चाहते निर्माण झाले आणि टीआरपी सुद्धा वाढली. रेमो डिसूझा व्यक्ती म्हणून हा उत्तम आहेच तसेच त्याने त्याच्या कष्टाने माणसाला ज्या सोयी सुविधा हव्या असतात, त्या सर्व त्याने मिळवल्या आहेत. त्यांनी कुटुंबासाठी बंगला गाडी सर्व कष्टाने खरेदी केले. हे करत असताना त्याला अनेक अडचणी आल्या तरीही तो परिश्रम करत राहिला.
अलीकडेच, ‘कर्ली टेल्स’च्या काम्या जानीने रेमो डिसूझाच्या ‘सबर’ या बंगल्याला भेट दिली आणि प्रेक्षकांना या आलिशान बंगल्याची सफर घडवली. रेमो डिसूझाने त्याच्या संघर्षाबद्दल आणि कुटुंबाबद्दलही मनमोकळेपणाने सांगितले. या व्लॉगमध्ये, रेमो आणि त्याची पत्नी लिझेल यांनी सर्वांना त्यांच्या घराचा सर्वात प्रिय आणि सुंदर भाग दाखवला. हे शिवमंदिर आहे, जिथे त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली आहे. तसेच बाप्पाची मूर्ती स्थापित आहे.
रेमो (remo)डिसूझा आणि लिझेल हे दोघे ख्रिश्चन असले तरी, त्याची भगवान शंकरावर श्रध्दा आहे. त्यानी घर होण्यापुर्वीच हे मंदीर बाधण्याचे पक्क केल होत. तसेच त्याने बोलताना रेमोने सांगितले की तो पूर्वी हिंदू होता, पण तो चर्चमध्ये खूप सेवा करत असे. एका धर्मगुरूंनी त्याला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि वयाच्या 15व्या वर्षी त्याने हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले. रेमोने सांगितले की त्याचे खरे नाव रमेश गोपी नायर आहे, पण धर्मांतर करताना त्याने आपला धर्म रमेशवरून बदलून रेमो ठेवला. मात्र आजही तो मनाने हिंदु आहे. त्याला भगवान शंकराची पुजा करायला आवडते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘श्री कृष्णा’मधील नटखट कान्हा आठवतात? आता आहे तो उत्तम सुपरस्टार
Comments are closed.