जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ, पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होणार?

पेट्रोल-डिझेलचे दर: पेट्रोल-डिझेलसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे. महागाईचा आणखी एक मोठा बॉम्ब तुमच्या खिशात फुटणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत. सरकारी सूत्रांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण,  गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेल्या किमती तुमचं बजेट वाढवू शकतात.

कच्च्या तेलाच्या किंमती मोठी वाढ

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढते युद्ध आणि रखडलेल्या शांतता चर्चेमुळे जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 126 डॉलरच्या चार वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्या आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष आता होर्मुझच्या सामुद्रधुनीवर केंद्रित झाले आहे.

भारतात किमती वाढतील का?

वास्तविक पाहता, सरकारी तेल कंपन्यांचा तोटा असह्य होत आहे. गेल्या चार वर्षांपासून किरकोळ किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या, पण आता परिस्थिती बदलली आहे. तेल मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर अंदाजे 20 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर अंदाजे 100 रुपयांचा तोटा होत आहे. गेल्या वर्षी 70 डॉलर असलेला कच्च्या तेलाचा भाव आता सरासरी 114 डॉलरच्या वर गेला आहे. यापूर्वी, देशात तेलाच्या किमती प्रति लिटर 25 ते 28 रुपयांनी वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, सरकारने हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले. अलीकडेच, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) उद्योगाच्या वतीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय ऊर्जा खर्चात लक्षणीय वाढ होऊनही पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजीच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही.

आजपासून एलपीजी गॅस सिलिंडर महाग

आज, 1 मे रोजी कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी, औद्योगिक डिझेल आणि जेट इंधनाच्या किमती वाढवल्या आहेत. आता सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलची पाळी आहे. दिल्लीत सध्या पेट्रोलचा भाव 94.77 रुपये आणि डिझेलचा भाव 87.67 रुपये आहे.

आणखी वाचा

Comments are closed.