Photo – धारदार नजर, हातात तलवार… पहा जिजाऊंच्या भूमिकेतील भाग्यश्रीचा लूक
मैंने प्यार किया’ गाजलेल्या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आजही तिच्या सौंदर्याने आणि फिटनेसने चाहत्यांना भुरळ घालत आहे. सुमन या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी भाग्यश्री आता एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याच्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात भाग्यश्री राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील जिजाऊंच्या रूपातील तिचा खास लूक समोर आला असून भाग्यश्रीने स्वतः सोशल मीडिया अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ऐतिहासिक वेशभूषा आणि चेहऱ्यावरील जिजाऊंना साजेसा करारीपणा पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटातील तिच्या या नव्या रूपाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून एका मोठ्या कालावधीनंतर भाग्यश्रीला अशा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.

Comments are closed.