इराणवर मोठा हल्ला करण्याची तयारी; आखातात हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तैनात, शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण युद्ध सध्या तात्पुरते थांबले आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या कमांडरने ट्रम्प यांना संभाव्य हल्ल्याबाबत माहिती दिली. या वेळी इराणवर हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला जाऊ शकतो, त्यादृष्टीने अमेरिकेने जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. आखातात अमेरिकेने अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची जुळवाजुळव सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार अॅडमिरल ब्रॅड पूपर यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीत इराण युद्धावर चर्चा केली. त्यांनी ट्रम्प यांना विविध पर्याय सांगितले. ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा निर्णय घेतल्यास एक लहान मात्र अतिशय शक्तिशाली हल्ला केला जाऊ शकतो. या हल्ल्यात इराणची उर्वरित लष्करी ठिकाणे, नेते व महत्त्वाच्या बांधकामांना लक्ष्य केले जाऊ शकते. या हल्ल्यात काही अत्याधुनिक शस्त्रास्त्र वापरण्याचा विचार संरक्षण मंत्रालय करत असल्याचीदेखील माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांद्वारे इराणची उर्वरित क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करण्यात येऊ शकते. याशिवाय अमेरिकेने बी-1बी बॉम्बर विमानांची तैनाती आखातात वाढविली आहे. या विमानांद्वारे मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रs तसे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रs वाहून नेता येतात. ट्रम्प यांनी मात्र युद्धबंदी सध्या मोडण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

युद्ध सुरू ठेवण्याचा प्रस्ताव टाळला

इराण युद्धाला 60 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. त्यापेक्षा जास्त दिवस युद्ध सुरू ठेवायचे असल्यास अमेरिकेच्या संसदेची मंजुरी लागते. ती मंजुरी घेण्याचा प्रस्ताव ट्रम्प यांनी टाळला. इराणसोबत 8 एप्रिलपासून युद्धबंदी आहे. त्यामुळे ही 60 दिवसांची मुदत संपलेली नाही, असा दावा अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी केला.

युद्धामुळे ट्रम्प व त्यांचे मित्र श्रीमंत झाले

अमेरिकेत डेमोव्रॅटिक पक्षाचे खासदार टेड लियू यांनी ट्रम्प यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले, इराण युद्धामुळे अमेरिकेत पेट्रोलचे दर प्रचंड वाढले असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. लोकांवर ताण वाढला आहे, मात्र ट्रम्प आणि त्यांचे अब्जाधीश मित्र खूप श्रीमंत होत आहेत.

युरोपियन महासंघावर 25 टक्के टॅरिफ

डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन महासंघाने उत्पादन केलेल्या सर्व कार आणि ट्रकवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. युरोपियन महासंघ व्यापार कराराचे पालन करत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. युरोपियन पंपन्यांनी अमेरिकेत उत्पादन केले तरच टॅरिफ लागणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. टॅरिफ वाढविल्यामुळे जर्मनी आणि फ्रान्स या देशांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याचवेळी अमेरिकेत कार आणि ट्रक महाग होऊ शकतात. तसेच युरोपियन महासंघाकडूनदेखील जशास तसे टॅरिफ लावले जाऊ शकते.

Comments are closed.