भोरमध्ये चिमुरडीला गोठ्यात नेऊन अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, ‘गृ
पुणे भोर क्राईम न्यूज: पुण्यातील भोर परिसरामध्ये एका चार वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार (Rape Case) करुन तिची निर्घृणपणे हत्या केली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे हा प्रकार घडला. ही अल्पवयीन मुलगी नसरापूरला तिच्या आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी एका नराधमाने तिला जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार (Sexual Assault) करुन तिची हत्या केली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संशयित व्यक्तीला पकडले असून पोलिसांनी (Pune Police) त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र, या व्यक्तीने आपण मुलीवर अत्याचार केल्याची बाब नाकारली आहे. मात्र, या घटनेनंतर शुक्रवार रात्री नसरापूर येथील वातावरण तापले होते. (Pune Girl Murder Case)
ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. विकृत कृत्य करणाऱ्या नराधमाला आमच्या हातात अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी आंदोलकांना स्वतः एसपी संदीप सिंग गिल यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिकांना रास्ता रोको स्थगित केला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली.
पुणे बलात्कार प्रकरणावर सुषमा अंधारे : सुषमा अंधारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका
पुणे भोर परिसरात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्याचा अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार, त्याचा निषेध करायलाही शब्द नाहीत. जिथे माणसाचे शब्द थिजतात, जिथे माणूसपण शिल्लक आहे की नाही, आपल्याकडे इतपत परिस्थिती निर्माण होते. आपण राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्यात? खरंच अपेक्षा करण्यासारखी परिस्थिती आहे का? जिथे प्रत्येकजण स्वत:चा ढोल वाजवण्यात मश्गूल आहे, स्वत:ची जाहिरात करुन घेण्यात आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यात व्यस्त आहे, तिकडे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्कील झालंय, हे चार वर्षांचं बाळ सुरक्षित नाही, चार वर्षांच्या लेकराला सुरक्षित सोडलं जात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकूल मागितला जात नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे, गृहमंत्र्यांना या गोष्टींचा काही फरकच पडत नाही, त्यांना देणेघेणं नाही. काही झालं तरी गृहमंत्री राजीनामा देणार नाहीत. ते दूरच राहिलं, मोठं भाषण करणे, आम्ही प्रकरणाचा मुळाशी जाऊ म्हणणे, या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं, त्याला झळ लागली, आपण एका असुरक्षित राज्यात आहोत, याचं भान आपल्याला असलं पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.