घरात सुन्न शांतता, प्रचंड एकाकीपणा जाणवतोय; मोठ्या बहि‍णींच्या आठवणीत उषा मंगेशकर भावूक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचे नुकतेच निधन झाले. 12 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याआधी 2022 मध्ये गानकोकिळा लता मंगेशकर यांचेही निधन झाले. या दोन महान गायिकेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. एकामागोमाग दोन मोठ्या बहिणी गमावल्याने ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर भावूक झाल्या आहेत. घरामध्ये आता सुन्न शांतता आणि प्रचंड एकाकीपणा जाणवत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुंबईत पार पडलेल्या 18 व्या ‘न्यूजमेकर्स अवॉर्ड्स 2026’ दरम्यान त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

गेल्या 4वर्षांत मी दोन्ही थोरल्या बहिणींना गमावले. माझ्या मोठ्या बहिणी आता या जगात नाहीत. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. केवळ माझ्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी ही मोठी हानी आहे. देशाने दोन महान गायिकांना गमावले आहे, असे त्या म्हणाल्या.

आशा भोसले यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या की, आमच्याकडे आठवणींचा खूप मोठा खजिना आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. पण आता घरी गेल्यावर खूप एकटं आणि उदास वाटतं. त्या दोघींच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. सतत घरात बसून दुःख करण्यापेक्षा मनाला थोडा विरंगुळा मिळावा आणि वातावरणात बदल व्हावा, म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहिले, असेही त्या म्हणाल्या.

Comments are closed.