IPL 2026 – आयुष्यात कधीही इतकं घाबरलो नव्हतो… वैभव सूर्यवंशीला भिडल्यानंतर काइल जॅमिसनची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात एका युवा खेळाडूची मोठी चर्चा पाहायला मिळाली. पण ही चर्चा त्याच्या फटकेबाजीमुळे नाही तर त्याच्या विकेटमुळे रंगलीये. राजस्थानचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याला बाद केल्यानंतर दिल्लीचा गोलंदाज काइल जॅमिसनचं सेलिब्रेशन वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. यावर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशीने जॅमिसनच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून दणक्यात सुरुवात केली होती. मात्र, जॅमिसनने पुढच्याच चेंडूवर वेगवान यॉर्कर टाकत वैभवला बोल्ड केले. विकेट मिळाल्यानंतर जॅमिसनने अत्यंत आक्रमक पद्धतीने आनंद साजरा केला. हे सेलिब्रेशन आयपीएल आचारसंहितेच्या नियमात बसणारे नसल्याने, बीसीसीआयने (BCCI) जॅमिसनवर कलम २.५ नुसार कारवाई केली आहे.

वैभवने यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या एका षटकात दोन षटकार ठोकले होते, त्यामुळे जॅमिसन दबावाखाली होता. सामन्यानंतर जॅमिसन म्हणाला की, “मी आयुष्यात कधीही 15 वर्षांच्या मुलाला इतका घाबरलो नव्हतो, जेवढी भीती मला वैभवची वाटत होती.”याच सामन्यात मिचेल स्टार्कने दमदार पुनरागमन केले. त्याने 40 धावा देत 3 महत्त्वाचे बळी टिपले, ज्यामध्ये यशस्वी जयसवालच्या विकेटचा समावेश होता. वैभव सूर्यवंशी जरी ४ धावांवर बाद झाला असला तरी, त्याने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Comments are closed.