Parenting Tips : केवळ संस्कार नको, पालकांनी द्यावेत मुलांना संरक्षणाचे धडे

नरसापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे संताप व्यक्त होत असतानाच, पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. येथे घडलेली घटना ही केवळ एक बातमी नसून सर्वांसाठी धोक्याची घटना आहे. शाळा, घर किंवा आसपासचा परिसर असो, आपली मुले खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता अनेक पालकांना पडला आहे. अनेकदा ओळखीच्याच व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचाराला मुले भीतीपोटी बळी पडतात किंवा लहान मुलांना कशाचे आमिष दाखवून अशा घटना घडतात. अशा परिस्थितीत मुलांना गुड टच बॅड चटसह पालकांनी  स्वसरंक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या मते, सर्वप्रथम पालकांनी 2-3 वर्षांनंतर शरीराचे अंग Private Part याबाबत मुलांना माहिती द्यावी. मुले 5 वर्षाचे होईपर्यंत मुलांनी कसे वागावे, याची माहिती द्यावी. उदाहरण द्यायचे झाल्यास मुलांना मुलींचा आदर करण्यास शिकवावे, कसे बोलावे, मुलींना कसे बसावे याबाबत थोडी थोडी माहिती द्यावी. यासह शरीरावर केवळ त्यांचाच अधिकार आहे हे नक्की सांगा.

जर एखाद्या नातेवाईकाने किंवा मोठ्या व्यक्तीने मुलाला जबरदस्तीने जेवळ घेण्याचा किंवा चुंबन घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला नाही म्हणण्यास शिकवावे. अशा स्थितीत घाबरून न जाता ओरडून तेथून पळून जायला शिकवावे.

पालकांनीही काका आहेत, आजोबा आहेत, ती तर आपली मावशी आहे.. ते आपले आहेत असे म्हणून मुलांवर कधीच प्रेशर देऊ नये.

अनोळखी व्यक्तीने दिलेला खाऊ किंवा खेळणी घेण्यास मनाई करण्यास शिकवा.

मुलांना शांत राहण्यापेक्षा गोंधळ घालणे(ओरडणे) कसे सुरक्षित असते हे सांगावे.

जर कोणी त्यांना जबरदस्तीने पकडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी “बचाव! बचाव!” किंवा “हे माझे पालक नाहीत!” असे मोठ्याने ओरडावे. हे आवाजाचे तंत्र त्यांना गर्दीत लक्ष वेधून घेण्यासाठी मदत करेल.

जर कोणापासून सुटका करून घ्यायची असल्यास हाताचा तळवा, गुडघा किंवा पायाच्या टाचेचा वापर करून समोरच्याच्या संवेदनशील भागावर (उदा. पाय, पोटाचा भाग) जोरात आघात करून सुटका करण्यास मुलांना शिकवावी.

मुलांना संकटाच्या वेळी कोणाकडे मदत मागावी हे शिकवा.

मुलांना त्यांच्या स्मार्टवॉच किंवा फोनवर ‘इमर्जन्सी कॉल’ कसा करायचा हे शिकवून ठेवा. त्यांना पालकांचे फोन नंबर तोंडपाठ असणे देखील गरजेचे आहे.

पालकांसाठी महत्त्वाची कृती –

मुलांसोबत छोटे छोटे प्रसंग घरीच करून पहा. उदा. “जर एखादे काका तुला कोपऱ्यात नेऊन काही देऊ लागले, तर तू काय करशील?” त्यांच्याकडून सराव करून घेतल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

जेव्हा मुले तक्रार करतात, तेव्हा “तूच काहीतरी केलं असशील” किंवा ते असं करणार नाहीत असे म्हणून त्यांना गप्प करू नका. त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांना जवळ घेऊन त्यांच्यासोबत काय घडले आहे हे नक्की विचारा.

मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देताना त्यांना ‘भीती’ घालू नका. त्यांच्या मनात सुरक्षिततेचा आणि धैर्याचा दृष्टिकोन निर्माण करा, जेणेकरून ते कोणत्याही संकटाचा सामना शांत डोक्याने करू शकतील.

हेही वाचा – Life Jacket: लाइफ जॅकेट म्हणजे ‘सेफ्टी’ असे नाही

Comments are closed.