प. बंगालमधील बिधाननगरच्या मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ; टीएमसी आणि भाजप समर्थकांमध्ये राडा

पश्चिम बंगाल निवडणूक निकाल 2026: पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बिधाननगर (Bidhannagar Election Result 2026) येथे रविवारी (3 मे, २०२६) मतमोजणी केंद्राबाहेर अभूतपूर्व राडा झाल्याचे बघायला मिळाले. यात तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) समर्थकांमध्ये संघर्ष उफाळून आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री स्ट्रॉंग रूमसमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला. आयएएनएसच्या वृत्तानुसार, या घटनेदरम्यान घोषणाबाजी आणि प्रति-घोषणाबाजी झाली, ज्याचे लवकरच संघर्षात रूपांतर झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने केंद्रीय दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीही घटनास्थळी येऊन समर्थकांना पांगवले. नंतर, तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांना वेगळे करण्यात आले आणि त्यांच्यामध्ये बॅरिकेड्स उभारण्यात आले.

Bidhannagar BJP vs TMC : तृणमूल कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे फडकवल्यामुळे हा वाद?

दरम्यान, या प्रकरणावर भाजपने आरोप केला आहे की, तृणमूल कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेरील त्यांच्या कॅम्पवर पक्षाचे झेंडे फडकवल्यामुळे हा वाद सुरू झाला. दरम्यान, भाजपच्या विरोधात बोलताना तृणमूल काँग्रेसने दावा केला की, केंद्रीय दलांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. किंबहुनाकेंद्रीय दल आणि बिधाननगर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली नाही. स्ट्रॉंग रूमच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, इतर सर्व मतमोजणी केंद्रांच्या बाहेर कडक व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रांच्या बाहेर फटाके फोडण्यास आणि विजय मिरवणुका काढण्यास प्रशासनाने यापूर्वीच बंदी घातली आहे.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा

मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आपल्या पक्षाच्या मतमोजणी प्रतिनिधींना, जिथे भाजप 500 ते 700 मतांनी आघाडीवर आहे, तिथे तात्काळ फेरमतमोजणीची मागणी करण्यास सांगितले. त्यांनी प्रतिनिधींना रविवारी रात्री लॉज किंवा हॉटेलमध्ये थांबण्याच्या सूचनाही दिल्याजेणेकरून ते सोमवारी सकाळी वेळेवर मतमोजणी केंद्रावर पोहोचू शकतील. त्यांनी सर्व विधानसभा मतदारसंघांतील प्रतिनिधींना एका व्हर्च्युअल बैठकीद्वारे या सूचना दिल्या.

Mamata Banerjee : सतर्क राहा, दृष्टी ठेवून राहा, रात्री जागून राहा, तक्रारी दाखल करा

मला विविध ठिकाणांहून असे अहवाल मिळत आहेत की, हेतुपुरस्सर भारनियमन केले जात आहे. हुगळीतील सेरामपूर, नादियातील कृष्णनगर, बर्दवानमधील औसग्राम आणि कोलकातातील खुदीराम अनुशीलन केंद्र यांसारख्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने भारनियमन, सीसीटीव्ही बंद करणे आणि स्ट्रॉंग रूममध्ये वाहनांची ये-जा अशा घटना घडल्या आहेत. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करते जसे मी सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी रात्रभर जागून काम करत आहे, तसेच तुम्हीही रात्रभर जागून स्ट्रॉंग रूममधील जनतेच्या मतांचे रक्षण करा. कुठेही काही संशयास्पद परिस्थिती निर्माण झाल्यास, त्यांना घेराव घाला, तात्काळ तक्रार दाखल करा आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी करा. हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून केले जात आहे. असा गंभीर दोष ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.