आसाममध्ये पुन्हा ‘हिमंत राज’! भाजपच्या विजय अश्वाची घोडदौड कायम, काँग्रेसला किती जागा?
आसाम निवडणूक निकाल 2026: आसाम विधानसभा निवडणुकांच्या (Assam Election Result 2026) कलानुसार भाजपच्या विजय अश्वाची घोडदौड कायम असल्याचे चित्र आहे. पहिल्या कलानुसार सुरवातीपासून भाजपने(BJP) जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंत भाजपनं 95 जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तर काँग्रेसला पहिल्या कलामध्ये 29 जागांवर समाधान मानावं लागतंआहे. तर ईतर 2 जागांवर अपक्ष आघाडीवर आहे. दरम्यान, पुढे आलेल्या कलानुसार भाजप आसामचा किंगमेकर ठरणार असल्याचेचित्र स्पष्ट आहे. दरम्यान, भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 30 हुन अधिक जागा मिळत आसाममध्ये पक्षाची ताकद वाढवली आहे.
Assam Election Result 2026: जलुकबारी, जोरहाटपासून ते दलगावपर्यंत कुणाची हवा, वाचा A to Z माहिती
दरम्यान आसाम विधानसभा 2026 निवडणुकीच्या ट्रेंडनुसार, भाजपने तीन-चतुर्थांशचा टप्पा ओलांडला असून 95 जागांसह आपली मजबूत आघाडी कायम ठेवली आहे. दरम्यान, आसाम च्या मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) जलुकबारी मतदारसंघात आघाडीवर आहेत. सुरुवातीचे ट्रेंड भाजपच्या बाजूने स्पष्ट जनादेश दर्शवत आहेत. आसाममधील जोरहाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हितेंद्र नाथ गोस्वामी आघाडीवर आहेत. काँग्रेसने या मतदारसंघातून गौरव गोगोई यांना उमेदवारी दिली आहे. जोरहाट मतदारसंघात भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी आघाडीवर आहेत, जिथे काँग्रेसने गौरव गोगोई यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, दलगावमध्ये एआययूडीएफचे मुजीबुर रहमान आघाडीवर आहेत आणि बिन्नाकंडीमध्ये मोहम्मद बद्रुद्दीन अजमल आघाडीवर आहेत.
Assam Election 2026 : सरकार स्थापन करण्याचा भाजपचा दावा
आसाम विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी गुवाहाटीमधील राजकीय वातावरण तापले आहे. गुवाहाटी सेंट्रल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विजय गुप्ता यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आयएएनएसशी बोलताना गुप्ता म्हणाले, “राज्यात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा भाजपला विश्वास आहे आणि त्यांचे सर्व उमेदवार चांगल्या फरकाने विजयी होतील.” त्यांनी असेही सांगितले की, जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंबा भाजपसोबत आहे, जो या विजयाचा पाया असेल. त्यांनी सांगितले की, भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, असा जनतेचा आधीच विश्वास आहे.
Assam Election 2026 : 126 जागांवर 722 उमेदवार रिंगणात
आसाम विधानसभा निवडणुकीतील सर्व 126 जागांसाठी मतमोजणी सोमवारी सकाळी 8 वाजता सुरू झाली. राज्यभरातील मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी सुरू आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवार सुरुवातीच्या ट्रेंडवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या निवडणुकीच्या निकालामुळे राज्याची राजकीय दिशा ठरेल, जिथे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनीही आपली पूर्ण ताकद लावली आहे. निकालांबाबत समर्थकांमधील उत्साह आणि उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत आहे.
आसाममधील 126 विधानसभा जागांसाठी एकूण 722 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांमधील 40 मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी पार पडणार आहे. मतदान 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात पार पडले होते. यात सुमारे 85.96 टक्के मतदान झाले होते, जे मोठ्या प्रमाणावर निर्णायक मानले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.