पंढरपूर कॉरिडॉरला हिरवा कंदील, चार हजार कोटींचा प्रकल्प
चार हजार कोटींच्या पंढरपूर कॉरिडॉर आणि शहराच्या विकास आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाच्या शिखर समितीकडून अखेर आज मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या आषाढी एकादशीला सुमारे 28 लाख भाविकांनी पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतले होते. कार्तिकी एकादशी व अन्य उत्सवांच्या वेळीही पंढरपुरात लाखो भाविकांची गर्दी होते. पुढील 50 वर्षांत तो आकडा अनेक पटींनी वाढणार आहे. त्याचाच विचार करून विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला काही व्यावसायिकांनी विरोध केला होता. कॉरिडॉरमुळे आपल्या दुकानांचे स्थलांतर होईल अशी भीती त्यांना वाटत होती. मात्र कॉरिडॉर झाल्यानंतर व्यवसाय आणखी वाढेल असे त्यांना पटवून देण्यात आले. कॉरिडॉरमुळे भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि जलद दर्शन मिळणार आहे.
Comments are closed.