एल.एल.एम. सीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करा! शिवसेनेच्या शिव विधी व न्यास सेनेची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऑल इंडिया बार (एआयबीई) व एल.एल.एम. सीईटी या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्याने कायदेविषयक शिक्षण घेणारे पदवीधर विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा देणे शक्य नसल्याने एल.एल.एम. सीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करावा अन्यथा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिव विधी व न्यास सेनेच्या वतीने मुंबई विद्यापीठाकडे निवेदनामार्फत करण्यात आली आहे.

एल.एल.एम. सीईटी परीक्षा 7 जून रोजी दुपारी 2 ते 3 या वेळेत नियोजित असून याच दिवशी ऑल इंडिया बारची परीक्षा (एआयबीई)देखील आयोजित करण्यात आली आहे. एआयबीई ही वकिली व्यवसायासाठी आवश्यक असलेली वैधानिक परीक्षा असून एल.एल.एम. सीईटी ही उच्च शिक्षणासाठी महत्त्वाची प्रवेश परीक्षा आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे कायद्याचे पदवीधर विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले आहेत. त्यामुळे एल.एल.एम. सीईटी परीक्षेची तारीख बदलावी किंवा दोन्ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिव विधी व न्याय संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनावणे आणि उपाध्यक्ष अॅड. स्वप्ना कोदे यांनी प्राधिकरणाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Comments are closed.