आठवड्याभराचा ‘फ्रिज मॅनेजमेंट प्लॅन’
दररोजच्या कामाच्या गडबडीत फ्रिज स्वच्छ ठेवणे , नियमित साफ करणे सगळ्यांनाच जमत नाही. त्यामुळे फ्रीजमध्ये बऱ्याचवेळा ताज्या भाज्यांबरोबरच उरलं सुरलही कोंबलं जातं.
यामुळे फ्रीजची अवस्था कपाटासारखी होते. यामुळे कितीही मोठ फ्रीज असलं तरी त्यात भाज्या ,फळं ठेवायला जागाच शिल्लक राहत नाही. पण थोडा स्मार्टनेस वापरून तुम्ही फ्रीज नीट नेटका ठेवू शकता. त्यासाठी आठवड्याभराचा फ्रिज मॅनेजमेंट प्लॅन नक्की ट्राय करुन बघा.
सोमवार
फ्रिजमधील सगळे पदार्थ बाहेर काढा
एक्सपायरी/जुने पदार्थ काढून टाका
शेल्फ स्वच्छ करा
मंगळवार
भाज्या धुवून, वाळवून चिरुन ठेवा
वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवून लेबल लावा
बुधवार
उरलेले पदार्थ वापरून नवीन डिश बनवा
उदा. भाजी → पराठा, भात → फ्राईड राईस
गुरुवार
फ्रिजमधील वस्तू पुन्हा नीट लावा
जुने पदार्थ पुढे ठेवा
शुक्रवार
दूध, दही, चीज यांची तारीख तपासा
खराब होण्याआधी वापरा
शनिवार
काय कमी आहे याची लिस्ट बनवा
गरजेपुरतेच सामान खरेदी करा
रविवार
पुढच्या आठवड्यासाठी थोडी तयारी करा
बेसिक ग्रेव्ही, उकडलेले पदार्थ तयार ठेवा
रोज 5 मिनिटे फ्रिज तपासा
सांडलेले पदार्थ लगेच पुसा
नवीन वस्तू मागे, जुने पुढे ठेवा
अन्न वाया जाणे कमी
वेळ आणि पैसे वाचतात
फ्रिज नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका राहतो
Comments are closed.