शताब्दी रुग्णालय मेडिकल महाविद्यालय प्रकल्प लटकला; निविदा प्रक्रिया लांबणीवर गेल्याने विलंब

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शताब्दी रुग्णालय मेडिकल महाविद्यालय प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून लटकला आहे. निविदा प्रक्रियेसाठी वारंवार मुदतवाढ दिली जात असल्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर गेला असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विलंब होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या प्रकल्पाला सुरुवात करून सर्वसामान्यांना दिलासा द्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय मेडिकल महाविद्यालय प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे काम पीपीपी तत्त्वावर पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र या निविदा प्रक्रियेला अल्पसा प्रतिसाद मिळत असल्याने हे काम गेल्या अनेक महिन्यांपासून लटकले आहे. त्यामुळे प्रशासनाने आणखी वेळ न दवडता निविदा प्रक्रियेत सहभागी पात्र संस्थेची योग्य निवड करून प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांच्यासह प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Comments are closed.