एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरुन संजय पाटलांना फोन, पत्नीच्या तब्येतीची विचारपूस, ठाकरेंच

उद्धव ठाकरे आणि संजय दिना पाटील: ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन शिवसेनांमध्ये शह-काटशह आणि कुरघोडीचे राजकारण होणे ही काही नवीन बाब नाही. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्या शिवसेनेचा (Shivsena) चांगलाच जम बसवला आहे. ठाकरे गटातील अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढून एकनाथ शिंदे (मराठी) यांनी आपल्या शिवसेनेचा विस्तारही केला आहे. यानंतरही एकनाथ शिंदे हे सातत्याने आपलाच पक्ष खरी शिवसेना कशी आहे, यादृष्टीने प्रतिकात्मक राजकीय डाव खेळण्याची एकही संधी सहसा सोडत नाहीत. असाच एक प्रकार मंगळवारी मुंबईत पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या पत्नीचा अपघात (Accident) झाल्यामुळे त्यांच्यावर सध्या मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही गोष्ट उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना समजल्यानंतर ते काल वेळात वेळ काढून संजय दिना पाटील यांच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी फोर्टिस रुग्णालयात गेले. ठाकरे गटाचा खासदार असूनही त्यांच्या संकटकाळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापूर्वी एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली होती. गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची प्रचंड चर्चा असताना एकनाथ शिंदे यांची ही कृती खूप काही सांगून जाणारी होती. एकनाथ शिंदे यांना आपल्या नेत्यांविषयी, कार्यकर्त्यांविषयी कशा जिव्हाळा आणि आपलेपणा आहे, असा अप्रत्यक्ष संदेश या माध्यमातून गेला होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी ठाकरे गटात हालचालींना सुरुवात झाली. (Maharashtra Politics news)

एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी फोन करुन खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या फोननंतर मातोश्रीचे विश्वासू अशी ओळख असलेले मिलिंद नार्वेकर हे फोर्टिस रुग्णालयात संजय दिना पाटील यांना भेटायला गेले होते. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनीही आपल्यालाही आपल्या नेत्यांची कशी काळजी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र, राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे यांनी एका साध्या कृतीतून ठाकरे गटावर कशी कुरघोडी केली किंवा सामान्य कार्यकर्त्यांना जपणारा नेता ही आपली प्रतिमा आणखी अधोरेखित कशी केली, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आणखी वाचा

मराठी and Sanjay Dina Patil: मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण

आणखी वाचा

Comments are closed.