तामिळनाडूमध्ये नव्या युतीसाठी हालचाली सुरू आहेत

टीव्हीकेसोबत काँग्रेसचा ‘डील’ : मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूत इतिहास रचणारे राजकीय परिवर्तन घडल आहे. विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यावर  राज्य दशकांनंतर पहिल्यांदाच आघाडी सरकार अनुभवणार आहे. अभिनेता ते राजकारणी झालेल्या विजय यांच्या नेतृत्वात तमिलगा वेत्री कडगम (टीव्हीके) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, परंतु 234 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक 118 संख्याबळ मिळविण्यासाठी आता आघाडीचा मार्ग अवलंबिणार आहे.

टीव्हीके मुख्यालयात मंगळवारी विजय यांच्याकडून निवडुन आलेल्या आमदारांसोबत बैठक घेण्यत आली. या बैठकीत आघाडीची रुपरेषा स्पष्ट झाली आहे. सूत्रांनुसार काँग्रेस (5 जागा), व्हीसीके (2 जागा), भाकप (2) आणि माकप (2) असे एकूण 11 आमदारांचे समर्थन टीव्हीकेला बहुमत मिळविण्यासाठी पुरेसे ठरणार आहे. या पक्षांसोबत टीव्हीकेची अनौपचारिक चर्चा आहे. विजय यांनी आघाडी सरकार स्थापन करण्याच इच्छा व्यक्त केली आहे.

जनता आघाडी सरकार इच्छित आहे. आम्ही आणि डावे पक्ष राज्यात धर्मनिरपेक्ष आघाडीच्या अंतर्गत काम करू अशी टिप्पणी व्हीसीके प्रमुख थोल थिरुमावलन यांनी केली आहे. तर विजय यांनी निवडणूक प्रचारादरम्यानच आघाडी सरकारच्या विचाराचे समर्थन पेले होते असा दावा टीव्हीकेच्या सूत्रांकडून करण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ वाटपाचे सूत्र

प्रस्तावित आघाडीच्या अंतर्गत काँग्रेसला 2 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तर व्हीसीके आणि डाव्या पक्षांना प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाऊ शकते. टीव्हीके स्वत:च्या सहकाऱ्यांना एकूण 4-6 मंत्रिपदे सोपविण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून अनुभवाची कमतरता दूर करता येईल. टीव्हीकेचे बहुतांश आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. अशास्थितीत विजय यांना अनुभवी आणि जाणकार लोकांची आवश्यकता आहे. याचमुळे सरकारमध्ये प्रशासकीय मजबुतीसाठी टीव्हीके माजी आयएएस अधिकारी आणि भ्रष्टाचरविरोधी प्रतिमा असलेले यू सगायम यांना विधानसभेत आणण्याची रणनीति आखत आडहे. विजय यांनी विजय मिळविलेल्या तिरुचि पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक करवून त्यांना विधानसभेत आणण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

नेतेपदी निवड

टीव्हीकेच्या बैठकीत विजय यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर राज्यपाल विजय यांच्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतील. पक्षानुसार विजय हे सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागू शकतात. तर चालू आठवड्याच्या अखेरपर्यंत सरकारचा कार्यभार सांभाळला जाईल. ही आघाडी तामिळनाडूच्या राजकारणात नवा अध्याय ठरू शकते असे राजकीय जाणकारांचे मानणे आहे.

 

आमच्या पक्षाचा कल द्रमुक आघाडीच्या दिशेने आहे, परंतु अंतिम निर्णय विजय यांची भूमिका स्पष्ट झाल्यावरच घेतला जाईल. विजय यांनी भूमिका स्पष्ट केल्यावर कुणाला समर्थन द्यावे याचा निर्णय आम्ही घेऊ. द्रमुक आघाडीसोबत आम्ही आहोत यात कुठलाच संशय नाही.

पी. शनमुगम, भाकप, राज्यसचिव

समर्थनावर निर्णय परस्पर चर्चेनंतर घेतला जाईल. व्हीसीके, भाकप आणि माकपचे नेते हे एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतील, ज्यानंतर अधिकृत भूमिका मांडली जाणार आहे.

थोल थिरुमावलन, व्हीसीके प्रमुख

Comments are closed.