अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची शक्यता, चांदीच्या भावात 20 हजारांनी घसरण, सोन्याचा आजचा भाव क
सोने आणि चांदीची किंमत: आखाती देशांमध्ये सुरु असलेले अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध तुर्तास थांबले असले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे हे युद्ध (Iran and America War) पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. इराणने अमेरिकेच्या एका जहाजावर हल्ला केल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा अस्थिरतेचे ढग दाटले असून याचा थेट परिणाम सोने (Gold) आणि चांदीच्या किंमतीवर (Sliver price) झाला आहे. (Gold and Silver Latest Price)
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धात शस्त्रसंधी घोषित झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळाले होते. यावेळी सोन्याचे दर जीएसटीशिवाय 1 लाख 53 हजार, तर एक किलो चांदीचा दर हा दोन लाख 65 हजारांवर जाऊन पोहोचला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यातील बोलणी निष्फळ ठरल्याने पुन्हा एकदा युद्धाचे सावट उभे ठाकले आहे. परिणामी सोने चांदीच्या दरात दिवसागणिक घसरण होताना दिसत असून आज सोन्याचे दर हे गेल्या पंधरवड्यातील दरांपेक्षा चार हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचा सध्याचा प्रतितोळा दर जीएसटीशिवाय 1 लाख 47 हजार 800 रुपयांपर्यंत खाली आला आहे, तर चांदीच्या दरातही 20 हजार रुपयांची मोठी घसरण होऊन चांदीचा प्रतिकिलो दर 2 लाख 45 हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडाला तर सोने आणि चांदी दरात अजूनही घसरण होण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. याचा विपरीत परिणाम गुंतवणुकदारांवर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जळगावातील सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी दिली.
Gold and Silver Buying: सोने-चांदी खरेदी करताना भावात तफावत का?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे (IBJA) दर देशभरात समान असले तरी सराफा दुकानातून सोने-चांदी खरेदी करताना त्यावर GST आणि मेकिंग चार्जेस लागू होतात. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना किंमत अधिक मोजावी लागू शकते. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात तफावत असू शकते.
आणखी वाचा
जगभरात पगारवाढीत भारत आघाडीवर, यावर्षी किती वाढणार तुमचा पगार? जाणून घ्या सविस्तर माहिती
आणखी वाचा
Comments are closed.