पोलीस डायरी – भाड्याची घरे ‘जिहादीं’ची आश्रयस्थाने
>> प्रभाकर पवार, prabhakarpawar100@gmail.com
सोमवार दि. २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या मीरा रोड (पूर्व) नया नगर येथे कोणत्याही अतिरेकी संघटनेशी संबंध नसणाऱ्या, परंतु एकट्यानेच (lone Wolf) हल्ल्याचा कट रचणाऱ्या जैब जुबेर अन्सारी (३१) या जिहादीने धर्म विचारून दोन हिंदू वॉचमनवर प्राणघातक हल्ला केला. चाकूने हल्ला करण्यापूर्वी या जिहादीने सुब्रतो सेन (३१) व राजकुमार मिश्रा (५०) या वॉचमनना इस्लाम धर्मात पवित्र समजला जाणारा कलमा पढण्यास (शपथ घेण्यास) सांगितले, परंतु कलमा येत नसल्याने या जिहादीने या दोन्ही वॉचमनना भोसकले. मिश्रा रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोटात धारदार चाकू खुपसल्याने मिश्राच्या पोटातील आतडे बाहेर आले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही वॉचमनना वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे ते वाचले. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पहलगाममध्ये धर्म विचारून जिहादींनी २५ हिंदू व एका मुस्लिम तरुणाची हत्या (२६ जणांची) केली होती. जैब जुबेर अन्सारीनेही तेच केले. धर्म विचारून वॉचमनवर हल्ला केला.
जैब जुबेर अन्सारी हा जिहादी पदवीधर असून तो घटस्फोटीत आहे. मीरा रोड येथील एका भाड्याच्या घरात तो राहत होता. त्याआधी तो मुस्लिमबहुल कुर्ला येथे राहत होता. तेथून तो आपल्या परिवारासह लंडनला गेला. तेथे राहून तो जहाल बनला आणि भारतात परतला. जगभरात मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचाराची त्याला प्रचंड चीड येत होती. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया (इसिस) या अतिरेकी संघटनेचा तो समर्थक झाला, परंतु त्याचा कुणी बॉस नव्हता. तो स्वतःहून ‘कट्टरपंथी’ (Self radicalized) बनला होता. अतिरेकी संघटनांची मॅन्युअल, पुस्तक किंवा इंटरनेटवरील माहिती वाचून जैब जुबेरसारखे जिहादी बनलेले (lone Wolf) जगभरात फिरत आहेत. संधी मिळताच ते कुणावरही प्राणघातक हल्ला करतात.
जैब जुबेरच्या एका आडनाव बंधूने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एका अमेरिकन शाळेवर हल्ला करण्याचा मध्यंतरी कट रचला होता. अनिस अन्सारी असे त्याचे नाव असून तो कुर्ला येथील कादीर बिल्डिंगमध्ये राहत होता व अंधेरीच्या सिफ्झ येथील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरी करीत होता. इराकमधील इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांशी तो इंटरनेटवर चॅटिंग करताना महाराष्ट्र एटीएसच्या जाळ्यात अडकला. त्या वेळी विवेक फणसळकर हे एटीएसचे प्रमुख होते. त्यांच्या पथकातील निनाद सावंत, योगेश चव्हाण, सतीश मयेकर या अधिकाऱ्यांनी अनिस अन्सारीचा अमेरिकन शाळेवर हल्ला करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे गोळा करून त्याला अटक केली. त्याला एक तप लोटून गेलेः परंतु अनिस अन्सारी काही जेलमधून सुटला नाही.
कोणत्याही मुस्लिम वस्तीत एखादा तरी कट्टरपंथी, जहालमतवादी कसून चौकशी केल्यास पोलिसांना आढळून येईल. इराण-इराक युद्ध सुरू असताना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरियाचा प्रमुख अबू बकर अल बगदादी या सुन्नी अतिरेक्याचे शौर्य, क्रौर्य ऐकून मध्यंतरी (२०१४) मुंबई, मुंब्रा, कल्याणमधील काही सुन्नी तरुण बहकले होते. बगदादीच्या बाजूने लढण्यासाठी ते इराकला पोहोचले होते. परंतु इराकमधील इसिसच्या अधिकाऱ्यांनी या सुन्नी तरुणांची कमजोर प्रकृती पाहून त्यांना हाकलून लावले. काहींकडून झाडलोट, शौचालये साफ करून घेतली, तर काहींचे लैगिक शोषण केले. धर्माच्या नावाखाली ही थट्टा आहे. हा कसला जिहाद? असा प्रश्न पडल्यावर काही तरुणांनी माघार घेतली. ते कसेबसे जीव मुठीत घेऊन हिंदुस्थानात परतले. मुंबईच्या मालवणीमधील दोन डझन मुस्लिम तरुणांचे एटीएसचे प्रमुख विवेक फणसळकर यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी निनाद सावंत, योगेश चव्हाण, मयेकर या अधिकाऱ्यांनी वेळीच ब्रेन वॉशिंग केल्यामुळे ते बचावले नाहीतर त्यांच्याही नशिबी इराकचा वनवास आला असता किंवा ते इराकमध्ये मारले गेले असते.
इसिसचा संस्थापक स्वयंघोषित (उच्चशिक्षित) खलिफा बगदादीने अमेरिकेच्या हल्ल्याच्या भीतीने प्रथम आपल्या दोन मुलांना ठार करून आत्महत्या केली. अशा धर्मवेड्या जिहादीच्या नादी लागून शेकडो सुत्री तरुणांनी आपले आयुष्य संपविले. तरुण वयात आनंद लुटायचा असतो, परंतु काही इमाम भडकावू भाषण देऊन तरुण पिढी बरबाद करीत आहेत. जोपर्यंत इमामांच्या, मौलानांच्या भाषणांवर नियंत्रण येणार नाही. तोपर्यंत जैब जुबेरसारखे जिहादी बनतच राहणार, गेल्या आठवड्यात जैब जुबेर मीरा रोडच्या नया नगरच्या वस्तीतून पकडला गेला. यापूर्वीही मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील काही आरोपी मीरा रोडच्या नया नगरमधून पकडले गेले होते. मुस्लिमबहुल वस्त्या या अतिरेक्यांची, जिहादींची आश्रयस्थाने बनत आहेत. भाड्याची घरे घेऊन ते धार्मिक कटकारस्थाने करीत आहेत. तेव्हा हिंदू-मुस्लिम घरमालकांनो, जैब जुबेर अन्सारीसारख्या भाडेकरूंपासून सावधान।
Comments are closed.