सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांना गोळ्या घालून संपवलं, घटनास्थळी नक्की काय घडलं?
सुवेंदू अधिकारी पीए चंद्रनाथ रथ हत्या: पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत विजय संपादन केल्यानंतर आता राज्यात रक्तरंजित संघर्षाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. बुधवारी रात्री या संघर्षाने टोक गाठले. भाजपचे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उत्तर परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरातील डोहरिया परिसरात ही घटना घडल्याचे समजते. चंद्रनाथ रथ हे आपल्या गाडीतून घरी जात होते. त्यावेळी काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीत शिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. (West Bengal Election Result 2026)
प्राथमिक माहितीनुसार, घटना घडली त्या मध्यमग्राम परिसरापासून काही अंतरावर चंद्रनाथ रथ यांचे घर आहे. ते आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून घरी जात असताना चंदेरी रंगाच्या कारमधून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांची गाडी रस्त्यात थांबवली आणि त्यांच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. या गोळ्या खूप जवळून झाडण्यात आल्या. या गोळ्या त्यांच्या डोक्यात, छातीत आणि पोटात लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेत चंद्रनाथ रथ यांचा सुरक्षारक्षकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चंद्रनाथ रथ हे शुभेंदू अधिकारी यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. गेल्या पाच वर्षांपासून रथ हे शुभेंदू अधिकारी यांचे पीए म्हणून कार्यरत होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही चंद्रनाथ रथ यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे चंद्रनाथ रथ यांच्या हत्येने पश्चिम बंगालमध्ये खूप मोठी खळबळ उडाली आहे.
कथा | बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. ही घटना मध्यग्राममधील दोहरिया येथे घडली. pic.twitter.com/oMET6SQm8w
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 6 मे 2026
चंद्रनाथ रथ हत्या: हल्लेखोरांनी 12 गोळ्या झाडल्या, पोलिसांनी शोध सुरू केला
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी करुन हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांकडून आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्या गाडीचा पाठलाग करुन त्यांना रस्त्यात थांबवले. यानंतर हल्लेखोरांकडून बेछूटपणे जवळपास 12 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी चार गोळ्या चंद्रनाथ रथ यांना लागल्या.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.