Digestion Tips: चपाती, पुरी की पराठा पोटासाठी हलकं आणि लवकर पचणारं काय?




चपाती, पुरी की पराठा पोटासाठी हलकं आणि लवकर पचणारं काय?


भारतीय घरांमध्ये जेवणात चपाती, पराठा आणि पुरी हे तिन्ही पदार्थ रोजच्या आहाराचा भाग असतात. पण अनेकदा जेवणानंतर पोट जड होणे, गॅस, ॲसिडिटी किंवा आळस येण्याचा अनुभव येतो. यामागे आपण काय खातो आणि ते कशा पद्धतीने बनवलं जातं, याचा मोठा संबंध असतो. विशेषतः तेल आणि तुपाचा वापर पचनक्रियेवर थेट परिणाम करतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने कोणता पदार्थ लवकर पचतो, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. (chapati vs paratha vs puri digestion guide)

1) चपाती
साधी चपाती किंवा फुलका हा पोटासाठी सर्वात हलका पर्याय मानला जातो. यामध्ये तेल किंवा तूप फार कमी प्रमाणात वापरलं जातं. तसेच यात फायबरचं प्रमाण चांगलं असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. चपाती पचण्यासाठी साधारणतः 2 ते 3 तास लागतात. चपाती वजन कमी करणारे, ज्यांना गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो अशा व्यक्तींसाठी फायदेशीर आहे.

२) पराठा
पराठ्यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर जास्त असतो. त्यामुळे तो चपातीपेक्षा जड ठरतो. विशेषतः बटाटा, पनीर किंवा इतर सारण भरलेले पराठे पचायला अधिक वेळ घेतात. असे पराठे पचण्यासाठी साधारणतः 3 ते 4 तास लागतात. म्हणून खाताना मर्यादा असावी जास्त खाल्ल्यास जडपणा आणि आळस जाणवू शकतो.

3) पुरी
पुरी ही डीप फ्राय केलेली असल्यामुळे त्यात तेलाचं प्रमाण खूप जास्त असतं. तेलकट पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे पुरी पचायला सर्वात जास्त वेळ लागतो. पुरी पचण्यासाठी लागणारा वेळ साधारण 4 ते 6 तास लागतात. जास्त सेवन केल्यास गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

आरोग्यासाठी काय निवडाल?
जर तुम्हाला हलकं आणि सहज पचणारं जेवण हवं असेल, तर चपाती हा सर्वोत्तम पर्याय आहे. पराठा आणि पुरी चविष्ट असले, तरी त्यांचा मर्यादित प्रमाणातच आस्वाद घ्यावा. विशेषतः रात्रीच्या जेवणात तेलकट पदार्थ कमी खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते.



Comments are closed.