Unhealthy Food: पोट बिघडवणारे विरुद्ध पदार्थ

काही पदार्थ एकत्र खाल्ल्यानंतर पोटाच्या समस्या वाढतात. यात प्रामुख्याने अॅसिडिटी, पोटात जळजळ, उलट्या ,जुलाब , गॅस यासारख्या पचनाशी संबंधित समस्यांनी व्यक्ती ग्रस्त होते. त्यामुळे आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. कारण आपल्या आहारात येणाऱ्या प्रत्येक पदार्थाचे स्वत:चे तत्व असते. ज्याला आपण आहार तत्व असे म्हणतो. यात प्रामुख्याने लवकर पचणारे पदार्थ आणि संथगतीने पचणारे पदार्थ असे दोन प्रकार असतात. यामुळे ज्यावेळी तुम्ही हे दोन विरोधी तत्व असलेले पदार्थ खाता त्यावेळी पाचन समस्या उद्भवतात. त्यासाठी या विरोधी पदार्थांची माहीती प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे समोर दिसेल ते तोंडात टाकण्याच्या सवयीलाही आळा बसेल आणि प्रकृतीही सुदृढ राहील.

दूध आणि चहा

काहीजणांना चहात वरून दूध टाकून पिण्याची सवय असते. पण हे चुकीचे असून चहातील अ‍ॅंटिइन्फ्लामेट्री तत्वामुळे चहातील औषधी गुण नष्ट होतात.

दूध आणि मासे

जर तुम्ही दूध आणि मासे एकत्र खाल्ले तर त्वचेचे विकार आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात .

दूध आणि आंबट फळे
जर दुधासोबत तुम्ही संत्रे, लिंबू खाल्ले तर तुमचे पोट बिघडू शकते. अॅसिडिटी, कोरडे ढेकर , गॅस याचा त्रास होतो.

दही आणि गरम पदार्थ
हल्ली बरेचजण यूट्यूबवरील व्हिडीओ बघून पदार्थ तयार करतात. यात अनेकवेळा काही गरम पदार्थांत दही टाकताना दाखवले जाते. जे आहार तत्वाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे पचनशक्तीवर ताण पडतो. पोट फुगते.

फळे आणि जेवण
जेवण आणि फळ हे दोन्ही विरोधी तत्वात मोडली जातात. ते एकमेकांना पर्याय असू शकतात. पण त्यांचे एकत्र सेवन अपचन वाढवते. जसे की काहीजण जेवणानंतर लगेचच फळ खातात. आधीच जेवल्यामुळे पोट भरलेले असते. त्यात तुम्ही वरून फळ खाल्ली की पोटावर ताण येतो. त्यामुळे अन्न पचनास वेळ लागतो.
गॅस, अपचनाचा त्रास होतो. पोट फुगतं, गॅस तयार होतो.

दही आणि मांसाहार
काहीजण चिकन , मटन बनवताना त्यात दही टाकतात. पण दह्याचे आहार तत्व थंड आहे तर चिकन हे गरम तत्वात येते. यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र शिजवल्यास पदार्थ पचण्यास जड होतो. त्यामुळे पचनासंबंधि त्रास होतो. पित्त वाढतं.

चहा आणि लिंबू
चहा आणि लिंबू एकत्र घेतल्यास अॅसिडिटी वाढू शकते. पोट दुखीही होते.

Comments are closed.