दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा (SSC) निकाल उद्या, 8 मे 2026 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. पुणे, मुंबई, नागपूर यांसह राज्यातील नऊही विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल. तत्पूर्वी, उद्या सकाळी 11:00 वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निकालाची सविस्तर आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.

यावर्षी देखील शिक्षण मंडळाने आपला निकालाचा वेग कायम राखला असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निकाल लावून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर केल्यानंतर, आता दहावीचा निकालही लवकर लागत असल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल sscresult.mahahsscboard.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटसह ‘डिजी लॉकर’वरही पाहू शकतील.

Comments are closed.