साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 10 मे 2026 ते शनिवार 16 मे 2026
>> नीलिमा प्रधान
मेष – किचकट कामे करून घ्या
मंगळ, शुक्र, बुध, रवि राश्यांतर. तुमच्या कार्याला नवी दिशा प्राप्त करेल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. कठोर शब्द वापरू नका. चातुर्यान sवागा. धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात केलेली तडजोड फायदेशीर ठरेल. शुभ दि. 10, 11
वृषभ – योग्य मार्गदर्शन घ्या
मंगळ, शुक्र, बुध रवि राश्यांतर. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. कोणतेही किचकट काम रेंगाळत ठेऊ नका. नोकरीधंद्यात नवे कंत्राट मिळवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. शुभ दि. 10, 11
मिथुन – तटस्थ भूमिका घ्या
मंगळ, शुक्र, बुध, रवि राश्यांतर. क्षेत्र कोणतेही असो उतावळेपणा, अहंकार दूर ठेवा. सौम्य धोरण ठेवा. चर्चेत दूरदृष्टिकोन ठेवा. नोकरीत कुणालाही कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा सांभाळा. धंद्यात हिशेब तपासा. शुभ दिवस. 11, 13
कर्क – वर्चस्व टिकवता येईल
मंगळ, शुक्र, बुध, रवि रश्यांतर दिलासा देणारे ठरेल. मैत्रीत, नात्यात गैरसमज होईल. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. क्षुल्लक कारणाने निराश होऊ नका. कुणावरही विश्वास ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. शुभ दिवस. 10, 13
सिंह – अडचणींवर मात करा
मंगळ, शुक्र, बुध, रवि राश्यांतर उत्साह, आत्मविश्वास वाढवतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. तुमच्या कामाची चर्चा होईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. कामे रेंगाळत ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करा. शुभ दिवस. 11, 15
कन्या – अहंकार दूर ठेवा
मंगळ, शुक्र, बुध, रवि राश्यांतर मनावरील दडपण कमी करतील. कोणत्याही निर्णयाची घाई नको. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. चातुर्याने प्रश्न सोडवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील. शुभ दिवस. 10, 13
तूळ – अनाठायी खर्च टाळा
मंगळ, शुक्र, बुध, रवि राश्यांतर संमिश्र स्वरूपाचे ठरेल. संयमाने कामे करा. नविन ओळखीवर विश्वास ठेऊ नका. नोकरी टिकवा. धंद्यात हिशेब तपासा. चेक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धा नको. तडजोड करा. चातुर्य वापरा. शुभ दिवस. 11, 15
वृश्चिक – कायदा मोडू नका
मंगळ, शुक्र, बुध रवि राश्यांतर विचित्र घडामोडींचे ठरेल. धावपळ, दगदग वाढेल. उत्साह असला तरी सावध रहा. वाहन जपून चालवा. तुमच्या बुद्धिचा उपयोग करून घेतला जाईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र घटना घडतील. शुभ दिवस. १३, १४
धनु – व्यवहार जपून करा
मंगळ, शुक्र, बुध, रवि राश्यांतर मानसिक, शारीरिक दडपण देणारे ठरेल. सहनशीलता ठेवा व निर्णय घ्या. नोकरीत स्पर्धा वाढेल. चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा मोडू नका. शुभ दिवस. 10, 11
मकर – विचारपूर्वक निर्णय घ्या
मंगळ, शुक्र, बुध, रवि राश्यांतर गुंतागुंतीचे वाटले तरी उत्साह व दिलासा देणारे ठरेल. कोणत्याही निर्णयाची घाई नको. धंद्यात कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कलाटणी देणारी घटना घडेल. मैत्री जपावी लागेल. शुभ दिवस. 11, 12
कुंभ – वरिष्ठांची मर्जी राखाल
मंगळ, शुक्र, बुध, रवि राश्यांतर उत्साहवर्धक वाटले तरी घाईत निर्णय ठरवू नका. मनाची अवस्था द्विधा राहील. नोकरीधंद्यात टिकाव धरा. अनाठायी खर्च होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. कायदा पाळा. शुभ दिवस. 11, 13
मीन – नावलौकिक वाढेल
मंगळ, शुक्र, बुध, रवि राश्यांतर. डोळ्यांची काळजी घ्या. व्यवसायात यांत्रिक सुधारणेवर खर्च होईल. नोकरीत नवा बदल शक्य. कलाक्षेत्रात प्रगती होईल. धंद्यात दगदग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. योजना पूर्ण करा. शुभ दिवस. १३, १४
Comments are closed.