पैशांनी फोडली ऑस्ट्रेलियन टीम? कमिन्सच्या मेगा सॅलरीनंतर 5 दिग्गजांनी उचललं बंडाचं पाऊल, क्रिके

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संकटात: ऑस्ट्रेलियन क्रिकेट सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या वेतनवादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. देशासाठी खेळण्याचा अभिमान आता पुरेसा राहिलेला नाही, कारण आयपीएल, SA20 आणि ILT20 सारख्या लीग्समधून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या ऑफर्स खेळाडूंना आकर्षित करत आहेत. या सगळ्यात मोठा वाद झाला तो पॅट कमिन्सला दिल्या जाणाऱ्या गोल्डन कॉन्ट्रॅक्टमुळे. आता पाच दिग्गज खेळाडूंनी स्पष्ट इशारा दिला आहे, मागण्या मान्य झाल्याशिवाय नव्या करारांवर सही नाही.

पॅट कमिन्सला 100 कोटींचा ‘सुपर डील’

रिपोर्टनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सला तब्बल 3 वर्षांसाठी 12 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरचं (सुमारे 100 कोटी रुपये) कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या तयारीत आहे. कमिन्सची ब्रँड व्हॅल्यू आणि नेतृत्व लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जात असला, तरी इतर वरिष्ठ खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. बोर्ड फक्त एका खेळाडूवर मेहरबान आहे, तर बाकींचे पगार टी20 लीग्सच्या तुलनेत खूपच कमी असल्याची भावना खेळाडूंमध्ये वाढत आहे.

विदेशी लीग्ससाठी NOC वरून तणाव

वादाचं दुसरं मोठं कारण म्हणजे NOC (अनापत्ती प्रमाणपत्र). पाच स्टार खेळाडूंनी जगभरातील टी20 लीग्समध्ये खेळण्यासाठी सहज परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या धावपळीच्या वेळापत्रकात स्वतःसाठी कमाईचे मार्ग खुले ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खेळाडूंचं म्हणणं आहे की करिअर मर्यादित असतं आणि त्या काळात जास्तीत जास्त कमाई करण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या धोरणांमुळे त्यात अडथळे येत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप, BBL आणि फुटीची भीती

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अंतर्गत संघर्ष किती गंभीर आहे, याचा अंदाज एका गोष्टीवरून येतो, तब्बल 12 प्रमुख खेळाडूंनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून बोर्डविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांची सर्वात मोठी तक्रार बिग बॅश लीगमधील पगारातील असमानतेबद्दल आहे. खेळाडूंचं म्हणणं आहे की सरासरी दर्जाच्या विदेशी खेळाडूंनाही स्थानिक खेळाडूंपेक्षा जास्त पैसे दिले जात आहेत. हा वाद लवकर मिटला नाही, तर ऑस्ट्रेलियाचे अव्वल व्हाईट-बॉल खेळाडू BBL सोडून थेट विदेशी लीग्सकडे वळू शकतात.

हे ही वाचा –

RCB vs MI IPL 2026 : मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी

आणखी वाचा

Comments are closed.