मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने

पंतप्रधान नरेंद्र मोदी: पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व भारतीय नागरिकांना त्यांनी हे आवाहन केलं आहे. भारत मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करतो, त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर गरजेनुसार योग्य पद्धतीनं करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. आपण आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसारच केला पाहिजे. यामुळे केवळ परकीय चलनच वाचणार नाही, तर युद्धाचे दुष्परिणामही कमी होतील. दरम्यान पंतप्रधानांनी आज देशवासियांना नऊ महत्वाची आवाहने केली आहेत.

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे 9377 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांसारख्या वस्तूंचा वापर गरजेनुसार करणे ही काळाची गरज आहे. आपण आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केवळ गरजेनुसारच केला पाहिजे. यामुळे केवळ परकीय चलनच वाचणार नाही, तर युद्धाचे दुष्परिणामही कमी होतील असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी यांची देशवासियांना उद्देशून केलेली नऊ आवाहने

1  पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत
2  खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा
3  पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका
4  वर्षभर परदेशी प्रवास टाळा
5  कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे
6  परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही
7  जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा
8  वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या
9  परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा

नवीकरणीय आणि पर्यायी ऊर्जा क्षेत्रात भारत पुढे वाटचाल करतोय

जेव्हा अमेरिका-इराण युद्धामुळे भारत ऊर्जा संकटाचा सामना करत आहे त्यावेळी पंतप्रधानांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असेही म्हणाले की, नवीकरणीय आणि पर्यायी ऊर्जा क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. सौर ऊर्जा उत्पादनात भारत जगातील अव्वल देशांपैकी एक बनला आहे. इतकेच नाही, तर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देऊन आयात इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यात अभूतपूर्व प्रगती झाली आहे.

पंतप्रधान मोदींनी दिला ऊर्जा धोरणावर भर

ऊर्जा धोरणावर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “प्रत्येक घराला एलपीजी पुरवणे हे सरकारचे पहिले उद्दिष्ट होते आणि आता परवडणाऱ्या पाईप गॅसचा (पीएनजी) पुरवठा वाढवण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. केंद्र सरकार ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्यासाठी सीएनजी-आधारित परिसंस्थेलाही सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे.”

तेलंगणामध्ये 9377 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

तेलंगणामध्ये 9377 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. आज भारत सुधारणा एक्सप्रेसवर पुढे जात आहे आणि आधुनिक पायाभूत सुविधा वेगाने उभारत आहे. पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये हैदराबाद-पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते महबूबनगर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग 167  चे चौपदरीकरण आणि संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबाद औद्योगिक क्षेत्राचा विकास यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, त्यांनी इतर अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले, ज्यात काझीपेट-विजयवाडा रेल्वे मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पाचे काही भाग, हैदराबादमधील ग्रीनफिल्ड पेट्रोलियम, तेल आणि वंगण (पीओएल) टर्मिनल, काझीपेट रेल्वे अंडर-रेल बायपास आणि वारंगलमधील पीएम मित्र पार्क, जे काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणूनही ओळखले जाते, यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut on PM Narendra Modi: ‘मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय’, पंतप्रधानांच्या भाषणावर संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेले…’

आणखी वाचा

Comments are closed.