निधी नसल्याची तक्रार करणे थांबवा!

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यावर स्टॅलिन यांचा निशाणा

वृत्तसंस्था, चेन्नई

जोसेफ विजय यांनी  रविवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी आता त्यांना लक्ष् य केले आहे. विजय यांना उद्देशून लिहिलेल्या अभिनंदनपर संदेशात स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळय्ण्यासाठी शुभेच्छा, परंतु सरकारकडे पैसे नाहीत, असे त्वरित म्हणू लागू नका, कारण सरकारकडे पुरेसा निधी आहे असे सुनावले आहे.

काँग्रेससमवेत अनेक सहकारी विजय यांच्या गोटात दाखल झाल्याने नाराज स्टॅलिन यांची कटूता अभिनंदनपर संदेशातही दिसून आली. पदभार स्वीकारल्यावर त्वरित विजय यांनी दिलेल्या आदेशाचे मी स्वागत करतो. पण विजय यांनी आता सरकारकडे निधी नसल्याची ओरड सुरू करू नये. कारण सरकारकडे पुरेसा निधी आहे, जो जनतेपर्यंत पोहोचविण्याची इच्छाशक्ती आणि शासन चालविण्याच्या क्षमतेची आवश्यकता आहे असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

5 वर्षांपर्यंत आम्ही कोविड आणि पूर यासारख्या अनेक समस्यांसोबत केंद्रातील भाजप सरकारच्या उपेक्षेचा सामना करत जनतेसाठी असंख्य कल्याणाकरी योजना लागू केल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला.

तामिळनाडूवर मर्यादित प्रमाणात कर्ज

द्रमुक सरकारने राज्याची तिजोरी खाली केल्याचा आरोप विजय यांनी अलिकडेच केला होता. याला स्टॅलिन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मागील सरकारने 10 लाख कोटीच्या कर्जाचा भार सोडला आहे, त्या सरकारने तिजोरी खाली केल्याचा आरोप विजय यांनी स्वत:च्या भाषणात केला आहे. परंतु तामिळनाडूवरील कर्ज स्वत:च्या स्तरापेक्षा कमीतकमी स्तराच्या आत आहे. आमच्या सरकारने फेब्रुवारीमधील स्वत:च्या अर्थसंकल्पातच स्थिती स्पष्ट केली होती. याबद्दल माहिती नसतानाही विजय यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. ज्या लोकांनी मतदान केले आहे, त्यांना विजय यांनी फसवू नये, मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नका असे स्टॅलिन यांनी सुनावले आहे.

आश्वासनांचे बारकावे

पूर्ण करता येतील अशीच आश्वासने देणार असे जनतेला सांगून विजय सत्तेवर आले आहेत. विजय आता शासकीय प्रशासनात पाऊल ठेवत आहेत. लवकरच ते आमच्याप्रमाणे जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे बारकावे शिकतील असा मला विश्वास आहे. मतदारांप्रमाणे मी देखील अशीच अपेक्षा करतो असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

Comments are closed.