दोन कार, टोल प्लाझा अन् यूपीआय पेमेंट; शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलिस कसे
बंगाल: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी (suvendu adhikari) यांचे सहायक चंद्रनाथ रथ (Chandranath Rath) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून तिघांना अटक केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी मोठे जाळे विणले होते. टोल प्लाझावर करण्यात आलेल्या यूपीआय पेमेंटमुळे आरोपींची ओळख उघड झाली आणि पोलिस तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला.(suvendu adhikari)
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विशाल श्रीवास्तव, राज सिंह आणि मयंक मिश्रा या तिघांना ताब्यात घेतले आहे. यापैकी दोघांना बिहार आणि एकाला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. 6 मेच्या रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तपास सुरू केला आणि अवघ्या आठवडाभरात मोठे यश मिळवले.(suvendu adhikari)
Suvendu Adhikari PA : यूपीआय पेमेंट आणि टोल प्लाझातून मिळाला महत्त्वाचा धागा
टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना मोठा धागा मिळाला. प्राथमिक तपासात चंद्रनाथ रथ यांच्या एसयूव्हीसमोर सिल्व्हर रंगाची निसान मायक्रा कार आल्याचे समोर आले. त्यानंतर रथ यांनी गाडी थांबवली आणि त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.(Chandranath Rath)
चंद्रनाथ रथ यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपींनी निसान मायक्रा कार घटनास्थळीच सोडून दिली आणि लाल रंगाच्या दुसऱ्या कार तसेच एका दुचाकीच्या मदतीने फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी त्या कारचा शोध सुरू केला.
रविवारी मयंक राज मिश्रा आणि विशाल यांना बिहारमधील बक्सर येथून अटक करण्यात आली, तर राज सिंह याला उत्तर प्रदेशातील बलिया येथून ताब्यात घेण्यात आले.
Suvendu Adhikari PA : एकाच कारमध्ये होते तिन्ही आरोपी
टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना बरेलीजवळील एका टोल प्लाझातून ही कार गेल्याचे पोलिसांना आढळले. कारमधील व्यक्तींनी यूपीआयद्वारे टोलचे पेमेंट केले होते. त्यावेळी कारमध्ये तिन्ही आरोपी एकत्र बसलेले होते. यूपीआय पेमेंटमुळे पोलिसांना आरोपींची ओळख पटली आणि तपास अधिक वेगाने पुढे सरकला. डिजिटल ट्रॅकिंगच्या मदतीने पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
Suvendu Adhikari PA : विशाल हा सराईत गुन्हेगार
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी व्यावसायिक सुपारी किलर आहेत. पैशांच्या मोबदल्यात हत्या करण्याचे काम ते करत होते. विशाल हा बिहारमधील बक्सरचा रहिवासी असून उर्वरित दोघे उत्तर प्रदेशातील आहेत. विशालविरुद्ध हत्या, दरोडा यांसह किमान 15 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज या आरोपींना पश्चिम बंगालमधील बारासात न्यायालयात हजर केले जाणार आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासादरम्यान डिजिटल पुरावे आणि आंतरराज्यीय संबंधांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. “ही मोठी कामगिरी आहे. हल्लेखोर पश्चिम बंगालबाहेरील असल्याचे सुरुवातीपासूनच संकेत मिळत होते. तांत्रिक देखरेख, डिजिटल ट्रॅकिंग आणि अन्य माहितीच्या आधारे एसआयटीच्या पथकांना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाठवण्यात आले होते,” असे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या मते, या हत्येच्या कटात आणि अंमलबजावणीत किमान आठ जण सहभागी होते. चंद्रनाथ रथ यांना लक्ष्य करण्यापूर्वी आरोपींनी सविस्तर रेकी केल्याचाही संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.