विजय थलपतीच्या शपथविधी सोहळ्यानंतर त्रिशा कृष्णनची पहिली पोस्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिने रविवारी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तिचा कथित प्रियकर आणि अभिनेता-राजकारणी विजयच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिली. विजयने तामिळनाडूचा पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्रिशाने तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्रिशाची ही पोस्ट पाहताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्रिशा आणि विजय यांच्या नात्याबद्दल खूप चर्चांना उधाण आले होते. मुख्य म्हणजे विजयच्या बायकोनेच या दोघांच्या प्रेमप्रकरणावर भाष्य केले होते. त्यामुळेच विजय थलपती यांच्या शपथविधी समारंभाला त्रिशाने लावलेली हजेरी खूप काही सांगून जात होती.

विजय’राज’ सुरू, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच तीन धडाकेबाज निर्णय; 200 युनिट वीज मोफत, ड्रग्जविरोधी टास्क फोर्स आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दल

शपथविधी सोहळ्यानंतर त्रिशाने दुसऱ्या दिवशी प्रेम हे कायमच बोलकं असतं असे म्हटले आहे. याचबरोबर तिने पोस्टमध्ये शपथविधीला तिने घातलेल्या पेहरावासंदर्भातील व्यक्तींचीही नावे पोस्टमध्ये लिहीली होती. त्रिशाने याआधी देखील विजय आणि तिच्या नात्याबाबत ओझरता का होईना सोशल मीडियाच्या माध्यमातून उल्लेख केला होता. परंतु अजूनही दोघांनीही अधिकृतपणे नात्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.

1999 रोजी विवाहबंधनात अडकलेला अभिनेता थलपती विजय आणि त्याची पत्नी संगीता या जोडीने आपल्या 26 वर्षांच्या वैवाहिक प्रवासाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला होता. विजय यांच्या पत्नी संगीता यांनी विजय यांच्यावर नामांकित अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केल्यानंतर सिनेसृष्टीत चर्चांना उधाण आले होते.

Comments are closed.