हिंमत असेल तर समृद्धी महामार्ग आणि प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग यामध्ये प्रकल्पाच्या भूसंपादनांची श्वेतपत्रिका काढा, रोहित पवार यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांना आव्हान
भूसंपादनाची माहिती अधिकाऱ्यांपेक्षा सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि भोंदूबाबाकडे जास्त असते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच हिंमत असेल तर समृद्धी महामार्ग आणि प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग यामध्ये प्रकल्पाच्या भूसंपादनांची श्वेतपत्रिका काढा असे आव्हान रोहित पवार यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे.
भुसंपादनाची माहिती फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. त्यावर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, भूसंपादनाची माहिती अधिकाऱ्यांपेक्षा सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि भोंदूबाबाकडे जास्त असते त्यामुळे ‘काखेत कळसा असताना गावाला वळसा मारण्यात काही अर्थ नाही’. गुप्त माहिती फोडणाऱ्याचा शोध घ्यायचा असेल तर समृद्धी महामार्ग, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग यामध्ये कोणाच्या जमिनी आहेत, प्रकल्प सुरू होण्याच्या दोन-तीन वर्ष आधी कोणी जमिनी घेतल्या याचा तपास करावा, सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे सत्य दिसून येईल. असो, असेल हिंमत तर दोन्ही प्रकल्पाच्या भूसंपादनांची श्वेतपत्रिका काढा! असेही रोहित पवार म्हणाले.
भूसंपादनाची माहिती अधिकाऱ्यांपेक्षा सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि भोंदूबाबाकडे जास्त असते त्यामुळे ‘काखेत कळसा असताना गावाला वळसा मारण्यात काही अर्थ नाही’. गुप्त माहिती फोडणाऱ्याचा शोध घ्यायचा असेल तर समृद्धी महामार्ग, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग यामध्ये कोणाच्या जमिनी आहेत,… pic.twitter.com/jdGYs0Xfbf
– रोहित पवार (@RRPSpeaks) १२ मे २०२६
Comments are closed.