उन्हाळ्यात एसी “ब्लास्ट”होण्याची कारणे, खबरदारी

आपल्या आजबाजूला घरात किंवा ऑफिसमध्ये अचानक एसीचा ब्लास्ट झाल्याचे आपण वाचत किंवा ऐकत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का उन्हाळ्यात सर्वाधिक घटना या एसी “ब्लास्ट”च्या असतात. यामुळे जर तुमच्या घरात किंवा ऑफिसमद्येही एसी असेल तर प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी एसी ब्लास्ट का होतो हे समजून घ्यायला हवं. तर तज्ञानुसार सतत एसी चालू ठेवल्यामुळे कॉम्प्रेसर खूप गरम होतो. ज्याला ओव्हरहिटिंग म्हणतात. त्यामुळेही ब्लास्ट होतो. तसेच जर तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये निकृष्ट दर्जाचे वायरिंग असेल त्याचे कनेक्श्नन सैल असेल तर स्पार्क होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागू शकते.

तसेच एसीमधील रेफ्रिजरंट गॅस गळती झाल्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर फिल्टरमध्ये धूळ जमा झाली असेल तर
एसीवर अतिरिक्त ताण येतो आणि तापमान वाढते. अशावेळी ब्लास्ट होण्याची शक्यता वाढते.

अचानक व्होल्टेज बदलल्याने कॉम्प्रेसर खराब होऊ शकतो. त्यामुळे लो व्होल्टेज किंवा व्होल्टेज फ्लक्चुएशनमुळे देखील एसीचा ब्लास्ट होवू शकतो.

जर तुमच्याकडे जुना किंवा खराब एसी असेल आणि अनेक वर्षे त्याची सर्व्हिसही न केलेली असेल तर एसी जास्त धोकादायक ठरतात.

काहीजण स्वस्त असल्याने एसीमद्ये स्वस्त किंवा डुप्लिकेट निकृष्ट दर्जाचे पार्ट्स वापरतात. पण त्यामुळे एसीला आग लागण्याचा धोका वाढतो.

या सर्व घटना टाळता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी काय करावे ते बघूया.

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी एसीची पूर्ण तपासणी करून घ्या.

स्टॅबिलायझर वापरावे. व्होल्टेज फ्लक्चुएशनपासून संरक्षण मिळते.

फिल्टर स्वच्छ ठेवावे. १५–३० दिवसांनी फिल्टर साफ करा.

सतत अनेक तास एसी चालू ठेवू नये. मध्ये थोडा ब्रेक द्यावा.

एसीत जळका वास किंवा विचित्र आवाज आल्यास त्वरित बंद करावा. ताबडतोब तज्ञाला बोलवावे.

योग्य वायरिंग वापरावी. हेवी लोडसाठी चांगल्या दर्जाची वायर आणि MCB वापरणे आवश्यक आहे.

एसीच्या आउटडोअर युनिटला हवा मिळेल याची काळजी घ्य

एसीचा तापमान सेटिंग २४–२६°C ठेवणे सुरक्षित आणि वीज बचतीसाठी चांगले मानले जाते.

रात्री झोपताना टाइमर वापरणे फायदेशीर ठरते.

Comments are closed.