गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार,

राज ठाकरे 2008 रेल्वे प्रकरण: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या (Raj Thackeray 2008 Railway Case) सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. 2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. याप्रकरणी ठाणे न्यायालयात सुनावणी सुरु होती. (Raj Thackeray Thane Court)

सदर प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ज्यात “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या” असा आरोप करत, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोप त्यात करण्यात आले होते. यामध्ये राज ठाकरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Raj Thackeray Thane Court)

मागच्या सुनावणीत काय घडलं होतं?  (Raj Thackeray 2008 Railway Case)

सदर प्रकरणी याआधीची सुनावणी 11 डिसेंबर 2025 रोजी झाली होती. ज्यामध्ये आपल्याला गुन्हा कबूल नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोर्टासमोर सांगितले होते. त्याशिवाय आपण न्यायालयीन प्रक्रियेला संपूर्णपणे सहकार्य करू असेही राज ठाकरेंनी त्यावेळी कोर्टात म्हटलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा आज कोर्टात ही सुनावणी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय? (Raj Thackeray 2008 Railway Case)

2008 साली  रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं.  या  हल्ल्यांच्या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ज्यात “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या” असा आरोप करत, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोप त्यात करण्यात आले होते.

सदर प्रकरणी राज ठाकरेंसह सात इतर मनसैनिकांवर विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती, पण नंतर राज ठाकरेंना दिलासा मिळाला होता. या प्रकरणी कल्याण न्यायालयात  सुनावणी सुरू होती  मात्र यानंतर हा गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला. सुनावणी दरम्यान आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने राज ठाकरे सह सर्व आरोपींना न्यायालयाने समज बजावत अटक वॉरंट देखील बजावले होते. यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलाने न्यायालयात अर्ज देऊन ते अटक वॉरंट देखील रद्द केला होता. त्यानंतर 11 डिसेंबर 2025 रोजी राज ठाकरेंनी ठाणे न्यायालयात हजर राहून मला गुन्हा मान्य नसल्याचं म्हटलं होतं.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray Thane Court: न्यायाधीशांनी विचारलं, गुन्हा कबूल आहे का?; राज ठाकरे म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही, ठाणे कोर्टात काय काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.