सात्त्विक-चिरागची विजयी सलामी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या अव्वल मानांकित हिंदुस्थानच्या पुरुष दुहेरी जोडीने थायलंड ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत दमदार विजयासह मोहिमेला प्रारंभ केला. सात्त्विक-चिराग या स्टार जोडीने इंडोनेशियाच्या मोह पुत्रा एरवियांस्याह आणि बागास मौलाना या जोडीचा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सात्त्विक-चिराग जोडीने 64 मिनिटे रंगलेल्या चुरशीच्या लढतीत 21-19, 21-23, 21-10 असा विजय मिळवला.

Comments are closed.