चेन्नई विमानतळावर विमानाला आग
चेन्नई
चेन्नईतील विमानतळावर अबूधाबीला जाणाऱ्या एका विमानाच्या एका हिस्स्याला आग लागली. या घटनेनंतर विमानाला उ•ाणापासून रोखण्यात आले. या विमानातून जवळपास 280 जण प्रवास करणार होते. एतिहाद एअरलाइन्सचे हे विमान उ•ाण करण्याच्या तयारीत असताना वैमानिकाला आग लागल्याचे कळले. यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरविण्यात आले. अग्निशमन दलाने त्वरित तेथे धाव घेत आग विझविली आहे.
Comments are closed.