Ratnagiri News – दापोलीत पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा; पेट्रोलचे दर वाढण्याच्या शक्यतेने गर्दी
दापोली शहरातील तसेच गिम्हवणे येथील काही पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचे फलक लावण्यात आले होते. तर काही पेट्रोल पंपावर इंधन विक्री सुरू होती. यामध्ये दापोली शहरातील श्वेता पेट्रोल पंप, मेहता पेट्रोल पंपावर तर गिम्हवणे येथील राजलक्ष्मी पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांनी एकच गर्दी केली होती.
दापोली शहरात ४ तर दापोली शहरानजिकच्या गिम्हवणे गावात २ पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी शहरातील तहसीलदार कार्यालयासमोरील भारत पेट्रोलियमच्या मेहता पेट्रोल पंपावर तसेच खोंडा येथील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या श्वेता पेट्रोल पंपावर तसेच जालगाव रोडवरील इंडियन ऑईल पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी वाहनांची बुधवारी मोठी रांग लागली होती.
दापोली खेड रोडवरील पेट्रोल पंप तसेच गिम्हवणे येथील पेट्रोल पंप वगळता दुसऱ्याही गिम्हवणेतील पेट्रोल पंपावर इंधनसाठा संपल्याने तो बंद होता. पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर वाढणार तसेच इंधनाचा तुटवडा भासणार असल्याच्या शक्यता असल्याने वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी मोठीच गर्दी केली होती. अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल करून घेतल्या.
Comments are closed.