पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य

पेट्रोल डिझेलची दरवाढ नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळं निर्माण झालेल्या स्थितीमुळं कच्चा तेलाच्या दरात मोठी वाढ होत आहे. यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाची स्थिती दीर्घकाळ चालू राहिली तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत संकेत दिले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दरवाढीसंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.

RBI गव्हर्नर काय म्हणाले?

संजय म्हलोत्रा स्वित्झरलँडमध्ये स्विस नॅशनल बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आयोजित परिषदेसाठी पोहोचले होते. या दरम्यान ते म्हणाले की जर अशीच स्थिती दीर्घकाळासाठी सुरु राहिली तर सरकाला वाढलेल्या दरांचा काही भार ग्राहकांवर टाकावा लागेल. ते म्हणाले की संघर्षाची स्थिती कायम असल्यानं उत्पादन शुलक कमी करण्यात आलं आहे. तर, सरकारी इंधनाचे रिटेल विक्रेते कच्चा तेलाच्या दरात झालेल्या वाढीचा सामना करत आहेत, असं त्यांनी म्हटलं.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या वक्तव्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर  संजय म्हलोत्रा यांनी देखील पश्चिम आशियात संघर्ष दीर्घकाळ सुरु राहिल्यास, जागतिक बाजारात वाढत असलेल्या तेलाच्या दरांचा विचार करता भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवावे लागू शकतात, असं म्हटलं. ऊर्जा साधनांच्या दरात वाढ झाल्यानं महागाईवर नियंत्रण मिळवणं अवघड होत आहे, त्यासाठी आरबीआयला प्रयत्न करतावे लागत आहेत.  आरबीआयची पुढील बैठक 5 जूनला होणार आहे.

आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीनं  एप्रिल 2026 मध्ये रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवला होता. हा जागतिक आव्हांनामुळं महागाई नियंत्रण करण्याचा एक उपाय होता. आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा म्हणाले की आरबीआयनं त्यांच्या धोरणात लवचिकता स्वीकारली आहे. आम्ही आकडेवारीवर अधिक अवलंबून होत आहोत. हे संकट अल्पकालीन असतं तर त्याकडे दुर्लक्ष करता आलं असतं. मात्र, हे संकट दीर्घकाळ राहिल्यास आम्हाला पावलं उचलावी लागतील, असं म्हलोत्रा म्हणाले.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात पेट्रोल आणि डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं म्हटलं. मात्र, सरकारी कंपन्यांना होत असलेल्या नुकसानाचा विचारकरता दर वाढवावे लागू शकतात, असं ते म्हणाले. पुरी यांनी म्हटलं की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर जाऊनही दर वाढवलेले नाहीत. यामुळं तेल कंपन्यांना दररोज 1000 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.