Beed News केज तालुका हादरला! चार वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधामाचा अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांनी दिला चोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नसरापूर येथील चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बीडमधील केज तालुक्यात देखील अशाच प्रकारची घटना होता होता राहिली. केज तालुक्यात एका 65 वर्षीय नराधमाने चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या भावाने वेळीच लोकांना आरडाओरडा करून बोलवले. सतर्क नागिरकांनी वेळेवर येत त्या नराधमाला बेदम चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदर चिमुकली तिचे आई वडिल व भावासोबत केज तालुक्यातील काळेगाव या गावात राहते. मंगळवारी तिची आई शेतात मजुरी साठी गेलली होती तर वडील आजारी असल्यामुळे घरात झोपले होते. त्यावेळी हे दोघे भाऊ बहीण घरा समोर खेळत होते. त्याचवेळी तिचा भाऊ जवळच दुकानावर खाऊ आणण्यासाठी गेला होता. तिच संधी साधत शेजारी राहणाऱ्या एका 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षाच्या चिमुकलीस उचलून त्याच्या घरात नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिचे कपडे फाडले.

याचदरम्यान दुकानातुन भाऊ घरी आला मात्र बहीण घरासमोर नसल्याचे पाहुन त्याने बहिणीचा शोध सुरू केला तेव्हा त्याला शेजाऱ्याचे घर बंद दिसले. त्याने त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला तेव्हा त्याला आतून बहिणीचा ओरडण्याचा आवाज आला. त्याने आरडा ओरडा करत आजुबाजुच्या लोकांना बोलावले. त्या लोकांनी नराधमाच्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्या सर्वांनी मिळून त्या नराधमास चांगला चोप दिला व चिमुकलीची सुटका केली.

मुलीचे आई शेतातून आल्यावर लागलीच केज पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी जाऊन त्या नराधमास ताब्यात घेतले असुन त्याच्या विरोधात पोक्स अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Comments are closed.