Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी

Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, महानगरात मेट्रोने प्रवास करावा असे आवाहन केले. मोदींच्या आवाहनानुसार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या ताफ्यातील गाड्या 50 टक्क्यांनी कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच पालखी मार्गाची पाहणी करताना ते बसने प्रवास करणार असल्याची माहिती आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पाची पाहणी 14 आणि 15 मे 2026 रोजी करणार आहेत.त्यावेळी ताफ्यातील गाड्या 50 टक्क्यांनी कमी करण्यात याव्यात अशी सूचना नितीन गडकरींनी पुणे प्रशासनाला केली आहे.तसेच पालखी मार्गाची पाहणी करताना सर्व सुरक्षा रक्षकांसोबत आपल्या लाल परीने म्हणजेच एसटी महामंडळाच्या बसने ते प्रवास करणार असल्याबाबत नितीन गडकरींनी नमूद केले आहे.

Comments are closed.