Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयात हजरे लावली होती. 2008 साली घेण्यात आलेल्या रेल्वे भरतीवेळी मनसेच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात राज ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरेंसह या प्रकरणातील इतर सहा जण सुद्धा कोर्टात हजर होते. न्यायालयात राज ठाकरेंचाही जबाब नोंदवण्यात आला असून माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, असे राज यांनी कोर्टात म्हटले. याप्रकरणी, न्यायालयाने पुढची तारीख 18 मे 2026 रोजीची दिली असून राज ठाकरेंना हजर राहण्याची गरज नसल्याचंही त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे. 2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या” असा आरोप करत, राज ठाकरे यांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना या आंदोलनात लक्ष्य केले होते. तसेच, आंदोलनात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोपही त्यात करण्यात आले होते. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राज ठाकरेंसह सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी, न्यायालयात आज सुनावणी झाली.
Comments are closed.