Shahzad Bhatti Special Report : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई

Shahzad Bhatti Special Report : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई

महाराष्ट्र एटीएसनं आज सकाळपासूनच विविध जिल्ह्यात छापेमारी केलीय. पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या टोळीशी संबंधित गुन्हेगार एटीएसच्या रडारवर आलेयत. पाकिस्तानशी संबंधित टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. काही जणांना ताब्यातही घेण्यात आलंय…. राज्यातील ५७ जण शहजाद भट्टीच्या संपर्कात  असल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे एटीएसकडून ही धडक कारवाई करण्यात आलीये… महाराष्ट्र एटीएसला काही काही संशयास्पद हालचालींची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार काही व्यक्तींचा संपर्क पाकिस्तानातल्या शहजाद भट्टीशी आणि त्याच्या सिंडिकेटशी असल्याचं समोर आलं. हाच धागा पकडून समोर एटीएसनं राज्यभरात छापेमारी केली. नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील तरुणांना बेकायदेशीर आणि देशविघातक कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. एटीएसनं एकाच वेळी अनेक ठिकाणी केलेल्या या छापेमारीमुळे गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे…सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यायत…पुढच्या काही दिवसांत आणखी धाडी, अटकसत्र आणि चौकशा वाढण्याचा अंदाज आहे..त्यामुळे एटीएसच्या या कारवाईत आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट..

Comments are closed.