वेळ विचारला; आरोपीनं जबरदस्तीने बसमध्ये खेचलं, धावत्या बसमध्ये दोन तास अत्याचार; मदतीसाठी ओरडल्
दिल्ली : दिल्लीच्या राणी बाग परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ३० वर्षीय महिलेवर चालत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघड झाली (Delhi Crime News) आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती उशिरा रात्री फॅक्टरीतून काम संपवून घरी परतत होती. याच दरम्यान तिने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तरुणाला वेळ विचारली, मात्र त्यावेळीच अगदी काही सेकंदातच तिचे आयुष्य भीती आणि वेदनेने भरून गेलं.(Delhi Crime News)
पिडीत महिलेने सांगितलेल्या माहितीनुसार, त्या तरुणाने तिला जबरदस्तीने बसच्या आत ओढले. बसमध्ये आधीपासूनच काही लोक होते. त्यानंतर चालत्या बसमध्ये सुमारे दोन तास तिच्यावर अत्याचार करण्यात आले.(Delhi Crime News)
Delhi Crime News: नांगलोईपर्यंत फिरत राहिली बस, मदतीसाठी महिला ओरडत राहिली पण..
पीडितेने सांगितले की, घटनेच्या वेळी बस वेगवेगळ्या भागात फिरत होती आणि नांगलोई परिसरापर्यंत गेली. महिला सतत मदतीसाठी ओरडत होती, मात्र आरोपींनी तिचे काहीही ऐकले नाही. आरोपींनी तिला मारहाणही केली. सुमारे दोन तासांनंतर आरोपी पिडीत महिलेला जखमी अवस्थेतच रस्त्यावर फेकून पसार झाले. महिलेने स्वतःला सावरले आणि पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली.
Delhi Crime News: वैद्यकीय तपासणीत अत्याचाराची पुष्टी
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत बलात्काराची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली स्लीपर बस ताब्यात घेतली आहे. तसेच, आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली असून लवकरच अटकेचा दावा पोलिसांनी केला आहे.
पीडिता पीतमपुरा येथील एका झोपडपट्टीमध्ये राहते आणि मंगोलपुरी येथील एका फॅक्टरीत ती काम करते. तिने पोलिसांना सांगितले की, तिचे पती आजारी असतात आणि घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावरती आहे. महिलेला तीन लहान मुली आहेत. याच कारणामुळे तिने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. जर ती कामावर गेली नाही, तर घर चालवणे कठीण होईल, असे त्या महिलेने म्हटले आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे.
Delhi Crime Case: पोलीस सर्व बाजूंनी तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी केला जात आहे. महिलेचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये आणखी कोण उपस्थित होते, याचाही शोध तपास पथक घेत आहे.
या घटनेबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दोन्ही आरोपींची सतत चौकशी करत आहेत. या गुन्ह्याचा कट काय होता आणि घटनेच्या वेळी इतर कोणताही व्यक्ती यात सामील होता का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
महिलेच्या जबाबाच्या आधारे एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बस जप्त करण्यात आली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व संभाव्य बाजूंनी तपास केला जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेतील बस ‘रॉयल ट्रॅव्हल्स अँड कार्गो’ (Royal Travels & Cargo) या कंपनीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय फरिदाबादमधील श्री हरी प्लाझा येथे असल्याचे समजते.
आणखी वाचा
Comments are closed.