नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याला आता पुण्याच्या येरवडा तुरुंगात नेण्यात आले आहे.

भीमराव कांबळे यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज पुणे न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. तिथे सुनावणीनंतर न्यायालयाने त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Comments are closed.