सत्तेच्या खुर्चीला असा फेव्हिकॉल लागलाय, जो चिकटला तो उठतच नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर बनला आहे. येथे कोणीही सन्मानाने निवृत्ती घ्यायला तयार होत नाही. कोणतेही पद मिळाले तरी माणसे समाधानी राहत नाहीत. ज्यांना मोठी पदे मिळालेली आहे, ते नेहमीच गॅसवर असतात. सत्तेच्या खुर्चीला असा फेव्हिकॉल लागला आहे, जो चिकटला तो उठायला मागत नाही, असे फटकारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सत्तेसाठी इकडून तिकडे कोलांटउडी मारणाऱ्या नेत्यांना लगावले आहे.

पनवेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सध्या राजकारणावर आणि सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर परखड मत व्यक्त केले. लोकांच्या अपेक्षांचा नेत्यांकडून विचार होणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले.

राजकारणात तृप्त आत्मे कमी

पदाधिकारी नगरसेवक झाला तरी तो आमदारकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून दुःखी आहेत. मंत्रीपदावर वर्णी लागली नाही म्हणून आमदारही दुःखी आहेत. चांगले खाते मिळाले नाही म्हणून मंत्रीही दुःखी आहेत. चांगले खाते मिळाले त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही म्हणून ते दुःखी आहेत. जे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना शाश्वती नाही की ज्येष्ठ नेते कधीपर्यंत ठेवणार आणि कधी काढणार, राजकरणात तृप्त आत्मे फार कमी आहेत, अशीही कोपरखळी त्यांनी लगावली.

Comments are closed.