विजय थलपती यांनी PM मोदींना लिहिलं पहिलं पत्र; तामिळनाडूचे मुख्यमंत्री होताच मोठी मागणी
नरेंद्र मोदींना विजय थलपथीचे पत्र: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (vijay thalapathy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना कापसावरील 11 टक्के आयात शुल्क (cotton import duty) तात्काळ हटवण्याचे आवाहन केले. वाढत्या कच्च्या मालाच्या किमतींमुळे राज्यातील वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांचे क्षेत्र गंभीर संकटाचा सामना करत असल्याचं विजय थलपती नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री विजय यांनी म्हटले आहे की, कापूस आणि सुताच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे वस्त्र उत्पादकांवर प्रचंड दबाव आला आहे आणि या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लाखो कामगारांच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे. तामिळनाडू हा भारतातील सर्वात मोठा वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांचा निर्यातदार असल्याचे वर्णन करून, मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले की, हा उद्योग लाखो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार पुरवतो. कापूस आणि सुताच्या किमतीत झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे तामिळनाडूचा वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांचा उद्योग गंभीर संकटाचा सामना करत आहे, असं विजय थलपती यांनी सांगितले. (Vijay Thalapathy Letter To Narendra Modi)
गेल्या दोन महिन्यांत कापसाच्या भावात 25 टक्क्यांनी वाढ- (cotton import duty)
मुख्यमंत्री विजय यांनी पुढे म्हटले आहे की, सदर दरवाढ प्रामुख्याने देशांतर्गत कापूस उत्पादनातील घट आणि देशभरातील वाढलेल्या व्यापारामुळे झाली आहे, ज्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे आणि वस्त्र उत्पादकांवर परिणाम झाला आहे. कच्च्या मालाचा स्थिर पुरवठा आता केवळ आयातीद्वारेच सुनिश्चित केला जाऊ शकतो, परंतु कापसावरील सध्याचे 11 टक्के आयात शुल्क आयातीला महाग आणि उद्योगासाठी तोट्याचे बनवत आहे. गेल्या दोन महिन्यांत कापसाचा भाव 54,700 रुपयांवरून 67,700 रुपये प्रति कँडीपर्यंत वाढला आहे, ही सुमारे 25 टक्क्यांची प्रचंड वाढ आहे. याच काळात सुताचे भावही 301 रुपये प्रति किलोवरून 330 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. ही दरवाढ प्रामुख्याने देशांतर्गत कापूस उत्पादनातील घट आणि देशभरातील वाढलेल्या व्यापारामुळे झाली आहे, ज्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे आणि वस्त्र उत्पादकांवर परिणाम झाला आहे, असंही विजय थलपती यांनी सांगितले.
विजय मुख्यमंत्री होताच नरेंद्र मोदींनी केलं होतं अभिनंदन- (Narendra Modi On Vijay Thalapathy)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केलं होतं. सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र मोदी म्हणाले की, विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विजय यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा आहेत. लोकांचे जीवन सुधारण्यासाठी केंद्र सरकार तामिळनाडू सरकारसोबत काम करत राहील, असं नरेंद्र मोदी यांनी म्हणाले होते.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.